नाशिक (प्रतिनिधी), ७ ऑक्टोबर २०२६ -
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी’ (अमृत - AMRUT) द्वारे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी निःशुल्क ॲग्रीकल्चर ड्रोन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून नाशिक जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती ‘अमृत’चे विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांनी दिली.
प्रशिक्षणाची मुख्य वैशिष्ट्ये व फायदे
पूर्णपणे मोफत प्रशिक्षण:
तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रत्यक्ष ड्रोन हाताळणी व उड्डाणाचे (Hands-on Flying) प्रात्यक्षिक दिले जाईल.
रोजगाराच्या संधी:
कृषी क्षेत्रात ड्रोनद्वारे औषध फवारणी, पीक पाहणी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगाराचे मार्ग उघडतील.
पहिली तुकडी:
प्रशिक्षणाची पहिली तुकडी २२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होत आहे.
पात्रता व निकष
वयोमर्यादा: १८ ते ५५ वर्षे.
उत्पन्न मर्यादा:
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखांच्या आत असावे.
लक्षित गट:
ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कोणत्याही स्वतंत्र शासकीय महामंडळ किंवा विभागाचा लाभ मिळत नाही, अशा २६ जातींमधील नागरिक (उदा. ब्राह्मण, कायस्थ, मारवाडी, पटेल, राजपूत, हिंदू वीरशैव लिंगायत, वैश्य/कोमटी, सिंधी, अग्रवाल, गुजराती, जाट, लोहाना इ.) या योजनेसाठी पात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे
प्रवेशासाठी उमेदवारांनी खालील कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे:
पासपोर्ट साईज फोटो
ओळखपत्र / रहिवासी पुरावा (पॅनकार्ड, अधिवास प्रमाणपत्र - Domicile)
उत्पन्नाचा दाखला: तहसीलदार प्रमाणित (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपर्यंत)
शैक्षणिक/वयाचा पुरावा: शाळा सोडल्याचा दाखला (LC)
वैद्यकीय प्रमाणपत्र: एमबीबीएस डॉक्टरांचे फिटनेस सर्टिफिकेट
अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क
इच्छुक उमेदवारांनी आपल्या तालुक्यानुसार खालील ‘अमृत मित्रां’शी संपर्क साधावा:
नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर: मयूर – ८८३००४६२५६
मालेगाव, येवला, चांदवड, निफाड, सिन्नर: दीपक गुप्ता – ९४२३४७६९२९
मनमाड, नांदगाव: अजिंक्य कनन्नल – ९६६५६९२६७६
कृषी क्षेत्रातील हे आधुनिक तंत्रज्ञान शिकून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ‘अमृत’ संस्थेतर्फे करण्यात आले आहे.