नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पर्यटकांना मोठी भेट... या दोन सुविधांचे उद्घाटन...

Share:
Main Image
Last updated: 05-Oct-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ ऑक्टोबर - वन्यजीव सप्ताहाच्या (२ ते ८ ऑक्टोबर) औचित्या साधून नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील खाणगाव थडी कॅम्प येथे नवनिर्मित 'निसर्ग निर्वाचन केंद्र' आणि 'तिकीट घरा'चा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. नाशिक वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (BNHS) वतीने राबविण्यात येणाऱ्या 'ग्रीन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम'अंतर्गत निसर्ग संरक्षक व निसर्ग मार्गदर्शक (नेचर गाइड) म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते अधिकृत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी

पर्यटक व नागरिकांना अभयारण्यातील अथांग जैवविविधतेची सखोल ओळख करून देणे, तसेच स्थानिक युवकांना निसर्ग संवर्धनाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या संपूर्ण उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उपवनसंरक्षक कृष्णा भवर आणि नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना, अभयारण्याच्या संरक्षणात आणि पर्यावरण जनजागृतीमध्ये या प्रशिक्षित मार्गदर्शकांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती

Advertisement

या सोहळ्याला वन विभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:

 * वन विभाग: सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, वनपाल राजेंद्र दोंड, वनरक्षक गोरख पाटील, कैलास सद्गिर, तसेच संरक्षण पथकातील गंगाधर आघाव, सुनील जाधव, एकनाथ साळवे आणि संजीव गायकवाड.

 * BNHS प्रतिनिधी: प्रोग्राम ऑफिसर नंदकिशोर दुधे, इन्फॉर्मेशन ऑफिसर नताशा गिरकर, तसेच संस्थेचे इतर प्रशिक्षक.

 * स्थानिक निसर्ग मार्गदर्शक: अमोल दराडे, विकास गारे, रोहित मोगल, पंकज चव्हाण, रोशन पोटे, अजित कुटे, साहिल झोमन यांसह सर्व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन निसर्ग निर्वाचन केंद्र आणि तिकीट घरामुळे नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांची सोय होणार असून, निसर्ग पर्यटनाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments

No comments yet.