राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करताच जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते पदी नियुक्ती... माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रवेश...

Share:
Main Image
Last updated: 05-Oct-2026

 

 

विलास कांबळे, येवला (५ ऑक्टोबर २०२६) -
मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला मतदारसंघात विकासाची कामे अविरतपणे सुरू आहे. या विकासाच्या मुद्यावर अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जोडले जात आहे. आज अमोल शिंदे यांच्या सारखा सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आल्याने पक्षाची अधिक ताकद वाढणार आहे. आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

येवला रामगीत लॉन्स येथे सामाजिक कार्यकर्ते अमोल शिंदे यांनी आज माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करण्यात आला. यावेळी अमोल शिंदे यांना उपजिल्हाध्यक्ष व येवला मतदारसंघातील प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Advertisement

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, नगरध्यक्ष राजेंद्र लोणारी, संभाजी पवार, अरुण मामा थोरात, काशिनाथ शिंदे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, येवला नगरपालिकेचे गटनेते दिपक लोणारी, प्रवीण बनकर, गणेश शिंदे, सुनील शिंदे, संजय शिंदे, मकरंद शिंदे, शिवाजी शिंदे, अमजद शेख, युनूस शेख, दयानंद जावळे, सुनील जाधव, अरबाज अन्सारी, वकील मेंबर, गणेश गायकवाड, एजाज शेख, अक्षय राजपूत, जावेद लखपती, सचिन साबळे, रोहित शिंदे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना महायुतीचे सरकार आहे. ज्याप्रमाणे केंद्र राज्य सरकारमध्ये आपण काम करतो त्याच प्रमाणे नगरपालिकेतही काम करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यादृष्टीने सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या विकासाच्या दृष्टीतून येवल्याचा विकास केला आहे. आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक विकासाची कामे करून येवला अधिक विकसित करण्यासाठी आपले प्राधान्य आहे. महायुती घटक पक्ष एकत्रित रित्या काम करत असल्याने येवला नगरपालिकेची टीम अतिशय भक्कम झाली असून येवला शहराचा विकास अधिक गतिमान होणार आहे.

ते म्हणाले की, येवला शहरात पिण्याच्या पाण्यासाठी येसगाव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. लवकरच हे कामे सुरू होऊन येवलेकराना दररोज पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. पुढील पंचवीस वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मनमाड येवला कोपरगाव हा सहापदरी रस्ता करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. येवला चिचोंडी औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणली आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. येवला शहराला स्वच्छ सुंदर आणि विकसित येवला करण्याचा आपला मानस असून या कामात सर्वांची साथ महत्वाची आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रवेश कर्ते अमोल शिंदे म्हणाले की, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या माध्यमातून येवल्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. येवला पाणी पुरवठा योजना, चिंचोडी औद्योगिक वसाहत  यासह अनेक महत्वपूर्ण कामे सुरू आहे. या विकासाच्या मुद्यावर आपण आज पक्षात प्रवेश करत आहोत. त्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करण्यास प्राधान्य देऊ तसेच पदाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यास काम करू असे त्यांनी सांगितले.

Comments

No comments yet.