किया मोटर्सचा CNG मध्ये धमाका... आणल्या या जबरदस्त कार... असे आहेत फिचर्स आणि किंमत...

Share:
Main Image
Last updated: 03-Oct-2026

 

पुणे, (प्रतिनिधी) ३ ऑक्टोबर - भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी 'किया इंडिया'ने आपल्या मल्टि-पॉवरट्रेन पोर्टफोलिओचा विस्तार करत आज 'कॅरेन्स सीएनजी' (Carens CNG) आणि 'कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजी' (Carens Clavis CNG) या दोन नवीन मॉडेल्सच्या किमती जाहीर केल्या. फॅक्टरी-फिटेड सीएनजी सिस्टीमसह येणाऱ्या या थ्री-रो (तीन रांगांच्या) कौटुंबिक गाड्यांची सुरुवातीची किंमत ₹१२,११,८०० (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

हे नवीन व्हेरियंट्स आधुनिक भारतीय कुटुंबांच्या दैनंदिन शहरी प्रवासाची सोय आणि लांबच्या कौटुंबिक प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत.

६०-लिटर सीएनजी टँक अन् 'स्टेपनी' कायम

कंपनीने या मॉडेल्समध्ये ६०-लिटर क्षमतेची सीएनजी टँक दिली आहे. विशेष म्हणजे, सीएनजी किट बसवल्यानंतरही गाडीत स्पेअर टायर (स्टेपनी) ठेवण्याची जागा कायम ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना जागेबाबत कोणतीही तडजोड करावी लागणार नाही.

प्रमुख वैशिष्ट्ये आणि तांत्रिक बाबी

 * इंजिन व परफॉर्मन्स: दोन्ही मॉडेल्समध्ये ‘स्मार्टस्ट्रीम जी१.५’ (Smartstream G1.5) इंजिन असून ते ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी (6MT) जोडलेले आहे. सीएनजी मोडमध्ये हे इंजिन ९६ PS पॉवर आणि १२३ Nm टॉर्क जनरेट करते.

Advertisement

 * ड्युअल-फ्युएल सुविधा: पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही इंधन पर्यायांच्या लवचिकतेमुळे दैनंदिन प्रवास अतिशय आर्थिक आणि सोयीस्कर होणार आहे.

 * सुरक्षा आणि सस्पेंशन: सीएनजीच्या अतिरिक्त वजनाचा विचार करून गाडीत ‘मॉडिफाइड सस्पेंशन’, आर१६ व्हील्स आणि मोठे १६-इंच फ्रंट डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत.

 * आरामदायी प्रवास: तिसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी ‘मॉडिफाइड थर्ड-रो सीट-बॅक फ्रेम’ दिली आहे, ज्यामुळे रेक्लाइन अँगल सुधारून उत्तम आराम मिळतो.

 * अॅडव्हान्स डिस्प्ले: ४.२-इंचाचा कलर TFT MID डिस्प्ले, सीएनजी फ्युएल चेंज स्विच आणि सीएनजी मोडमध्ये ‘डिस्टन्स टू एम्प्टी’ (DTE) दाखवणारे लॉजिक या गाड्यांमध्ये समाविष्ट आहे.

ग्राहक-केंद्रित पाऊल: अतुल सूद

या लाँचिंगप्रसंगी किया इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (मार्केटिंग अँड सेल्स) अतुल सूद म्हणाले, "भारतातील ग्राहकांच्या प्रवासाच्या गरजा वैविध्यपूर्ण आहेत. कार्यक्षम आणि व्यावहारिक मोबिलिटी शोधणाऱ्या ग्राहकांसाठी सीएनजी हा अत्यंत महत्त्वाचा पर्याय आहे. कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिसने आपल्या ऐसपैस जागा आणि कौटुंबिक उपयुक्ततेमुळे आधीच प्रबळ स्थान निर्माण केले आहे. आता फॅक्टरी-फिटेड सीएनजीच्या समावेशामुळे ग्राहकांना निवडीचे अधिक स्वातंत्र्य मिळेल."

 

Comments

No comments yet.