TCS कथित लैंगिक छळ व धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान अडचणीत... आता पतीच गेला कोर्टात...

Share:
Main Image
Last updated: 03-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ३ ऑक्टोबर - टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) नाशिक येथील युनिटमध्ये घडलेल्या बहुचर्चिेत लैंगिक छळ आणि कथित धर्मांतर प्रकरणातील (TCS Harassment & Conversion Case) मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या निदा खान हिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या वादग्रस्त प्रकरणानंतर निदा खानच्या पतीने नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयात विवाह रद्दबातल ठरवण्यासाठी घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने निदा खानला समन्स बजावले आहे.

कौटुंबिक न्यायालयाकडून १६ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक न्यायालयाने २२ ऑगस्ट रोजीच निदा खानच्या पतीच्या याचिकेवरून हे समन्स जारी केले होते. न्यायालयाने निदा खान किंवा तिच्या वकिलांना १६ ऑक्टोबर रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. TCS प्रकरणातील अटकेनंतर निदा खान हिला नंतर जामीन मंजूर झाला होता. मात्र, आता कौटुंबिक पातळीवरही तिच्या अडचणी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

नेमके काय आहे TCS लैंगिक छळ व धर्मांतर प्रकरण?

Advertisement

नाशिक येथील TCS कार्यालयात कार्यरत असलेल्या काही महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ करणे आणि त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणणे असा गंभीर आरोप निदा खान आणि तिच्या सहकाऱ्यांवर करण्यात आला होता. या प्रकरणाचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली होती. एसआयटीने (SIT) या प्रकरणात सखोल तपास करून आतापर्यंत न्यायालयात दोन स्वतंत्र दोषारोपपत्रे (Charge Sheets) दाखल केली आहेत.

पतीने घेतला घटस्फोटाचा निर्णय

TCS प्रकरणातील पोलिसांचा कारवाईचा बडगा आणि लागलेले गंभीर आरोप या पार्श्वभूमीवर निदा खानच्या पतीने वैवाहिक संबंध संपुष्टात आणण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या कौटुंबिक वादानंतर आता १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Comments

No comments yet.