पुणे, (प्रतिनिधी) ३ ऑक्टोबर - रिलायन्स जिओने आपल्या १० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत भारतीय ग्राहकांसाठी एक मोठी आणि आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने ‘जिओभारत 4G’ (JioBharat 4G) हा फीचर फोन अवघ्या ₹१,४९९ मध्ये उपलब्ध करून दिला असून, या फोनसोबत ६ महिन्यांचे रिचार्ज पूर्णपणे मोफत दिले जात आहे. या मोफत प्लानअंतर्गत ग्राहकांना दरमहा १४ GB डेटा आणि अमर्याद (Unlimited) HD व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.
या ऑफरमुळे फोन खरेदी केल्यानंतर पुढील ६ महिने ग्राहकांना रिचार्जवर एक रुपयाही वेगळा खर्च करावा लागणार नाही.
2G वरून 4G वर जाण्याचा खर्च अवघा ₹२९९
कंपनीने ही विशेष ऑफर अजूनही 2G फीचर फोन वापरणाऱ्या देशातील करोडो ग्राहकांना डिजिटल प्रवाहात आणण्यासाठी सादर केली आहे.
गणिताचे गणित: साधारणपणे 2G युजर्स दरमहा सुमारे ₹१९९ चे रिचार्ज करतात, ज्याचा ६ महिन्यांचा एकूण खर्च सुमारे ₹१,२०० होतो.
प्रत्यक्ष खर्च: ₹१,४९९ च्या या ऑफरमध्ये ₹१,२०० मूल्याचे ६ महिन्यांचे रिचार्ज मोफत मिळत असल्याने, २G वरून आधुनिक 4G नेटवर्कवर अपग्रेड होण्यासाठीचा प्रत्यक्ष अतिरिक्त खर्च ग्राहकांसाठी केवळ ₹२९९ इतकाच पडतो. (टीप: फोन खरेदी करताना ग्राहकांना संपूर्ण ₹१,४९९ ची रक्कम एकरकमी द्यावी लागेल.)
'जिओभारत 4G' मधील खास सुविधा
4G नेटवर्कवर अपग्रेड झाल्यानंतर ग्राहकांना केवळ इंटरनेटच नाही, तर अनेक डिजिटल सुविधांचा आनंद घेता येईल:
मनोरंजन: 'जिओटीव्ही'द्वारे ५०० हून अधिक थेट (Live) टीव्ही चॅनेल्स, 'जिओहॉटस्टार'वर थेट क्रिकेट सामने, चित्रपट व मालिका आणि 'जिओसावण'वर संगीताचा आनंद.
डिजिटल पेमेंट: 'जिओपे'च्या (JioPay) माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने यूपीआय (UPI) पेमेंट करण्याची सुविधा.
फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि मॉडेल्स
डिस्पले व बॅटरी: या फोनमध्ये २.४ इंचांची स्क्रीन आणि दीर्घकाळ टिकणारी २००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
लागू मॉडेल्स: ही वर्धापनदिन विशेष ऑफर जिओभारतच्या निवडक A1, B1, B2 आणि B3 या मॉडेल्सवर उपलब्ध असणार आहे.