नाशिक जिल्ह्यात १५६ महसूल सेवक पदांची भरती... कुणाला संधी? अर्ज कुठे आणि कसा करायचा?

Share:
Main Image
Last updated: 03-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ३ ऑक्टोबर - नाशिक जिल्ह्यातील महसूल विभागातील १५६ रिक्त महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या भरतीस शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांना ३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिकचे उपजिल्हाधिकारी (महसूल) कुंदन हिरे यांनी केले आहे.

तालुकानिहाय १५६ पदांचा तपशील:

जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील रिक्त पदांच्या संख्येनुसार भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे:

 * बागलाण: २६ पदे

 * नाशिक व दिंडोरी: प्रत्येकी १६ पदे

 * कळवण (१००%): १४ पदे

 * मालेगाव: १४ पदे

 * सुरगाणा (१००%): १२ पदे

 * निफाड: ११ पदे

 * इगतपुरी: १० पदे

Advertisement

 * देवळा: ८ पदे

 * सिन्नर: ७ पदे

 * नांदगाव: ६ पदे

 * येवला: ५ पदे

 * पेठ (१००%) व चांदवड: प्रत्येकी ४ पदे

 * त्र्यंबकेश्वर (१००%): ३ पदे

अर्जाची प्रक्रिया व माहिती कुठे मिळवावी?

भरतीबाबतची सविस्तर जाहिरात, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर निकष उमेदवारांना खालील ठिकाणी पाहायला मिळतील:

 * अधिकृत संकेतस्थळ: नाशिक जिल्ह्याचे अधिकृत एन.आय.सी. (NIC) पोर्टल.

 * ऑफलाईन माहिती: संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालय.

उमेदवारांना अर्ज करताना किंवा भरती प्रक्रियेबाबत काही शंका अथवा अडचण असल्यास त्यांनी तात्काळ आपल्या संबंधित तहसील किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे यांनी स्पष्ट केले आहे.

 

Comments

No comments yet.