सासरा-सुनेला टोळक्याकडून बेदम मारहाण... सुनेच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार... चौघांवर गुन्हा दाखल...

Share:
Main Image
Last updated: 01-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) १ ऑक्टोबर - पूर्वीच्या पोलीस तक्रारीची कुरापत काढून एका टोळक्याने सासरा आणि सुनेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना दिंडोरी रोडवरील जे. के. टायर दुकानाजवळ घडली. या हाणामारीत सुनेच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी करण्यात आले असून, जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित सुनेच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लता शिंदे, किर्ती चव्हाण, प्रकाश चव्हाण आणि किरण चव्हाण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी भारती जाधव (वय २०, रा. भराडवाडी, फुलेनगर) या विवाहितेने फिर्याद दिली आहे.

नेमका प्रकार काय?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भारती जाधव या बुधवारी (३० सप्टेंबर) आपल्या सासऱ्यांसोबत दिंडोरी रोड परिसरात काही कामासाठी गेल्या होत्या. त्यावेळी संशयित लता शिंदे आणि किर्ती चव्हाण या महिलांनी पीडितेच्या सासूने आपल्या भावाच्या मुलांविरोधात आधी दिलेल्या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून कुरापत काढली आणि सासऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

भांडण सोडवण्यासाठी व सासऱ्याच्या मदतीसाठी पीडित सून पुढे आली असता, संशयित प्रकाश चव्हाण यांनी तिला बेदम मारहाण केली. याच दरम्यान संशयित किरण चव्हाण याने स्वतः जवळील धारदार शस्त्राने सुनेच्या पाठीवर वार केले. यात ती गंभीर जखमी झाली.

Advertisement

जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत धाव

घटनास्थळी आरोपींनी सासरा आणि सुनेला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर पीडितांनी तात्काळ पंचवटी पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली व फिर्याद नोंदवली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंचवटी पोलिसांनी चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार सानप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

चॉपर बाळगणारा जेरबंद...

धारदार चॉपर बाळगणाºया एकाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई ही कारवाई म्हसरूळ दिंडोरी लिंकरोड भागात करण्यात आली. संशयिताच्या ताब्यातून लोखंडी चॉपर हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसाद प्रकाश मोहिते (१८ रा. साई प्रेम सोसा.साईनगर पोकार कॉलनी) असे शस्त्रबाळगणाºया संशयिताचे नाव आहे. दिंडोरीरोडवरील मॅकडोनाल्ड परिसरातील मोकळ््या जागेत बसलेल्या एकाकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.३०) पथकाने धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या त्याच्या ताब्यातून धारदार चॉपर हस्तगत करण्यात आला आहे. या बाबात अंमलदार गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून हवालदार देवराम चव्हाण या गुह्याचा तपास करीत आहेत.

 

Comments

No comments yet.