महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या नाशिक शाखा चेअरमनपदी सचिन शहा... शताब्दी वर्षात कार्यकारिणीवर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड...

Share:
Main Image
Last updated: 30-Sep-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ३० सप्टेंबर - व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर'च्या नाशिक शाखा चेअरमनपदी सचिन शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या मुंबई येथे मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर) पार पडलेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. याच बैठकीत शाखा को-चेअरमनपदी सौ. दिपाली चांडक व सुरेश चावला, तर नाशिक जिल्हा समन्वयकपदी भावेश मानेक यांची निवड करण्यात आली आहे.

शताब्दी वर्षात नाशिक शाखेवर मोठी जबाबदारी

१९२७ मध्ये स्थापन झालेली ‘महाराष्ट्र चेंबर’ ही संस्था यंदा आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहे. १९७३ मध्ये स्थापन झालेल्या नाशिक शाखेने उत्तर महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्राला जागतिक स्तरावर बाजारपेठ मिळवून देण्यात नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक शताब्दी वर्षात नाशिक शाखेच्या नूतन कार्यकारिणीकडे उद्योजक आणि व्यापारी वर्गाचे विशेष लक्ष लागले आहे.

मुंबईतील कार्यकारिणी सभेत चेंबरचे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्षा सौ. सुनिता फाल्गुने, महेंद्र अग्रवाल, राज्य मुख्य समन्वयक वेदांशू पाटील व विविध विभागांचे उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत या नियुक्त्या जाहीर केल्या.

विविध विषय समित्यांवरही नाशिककरांचा डंका

कार्यकारिणी सभेत संस्थेच्या विविध विषय समित्यांचे चेअरमन व को-चेअरमनही घोषित करण्यात आले:

कृषी आणि फलोत्पादन समिती (चेअरमन) : राजाराम सांगळे

एफएमसीजी समिती (चेअरमन) : प्रफुल्ल संचेती

दृष्टी, धोरण व माध्यम समिती (चेअरमन) : शिवाजी मानकर

मासिया बिझनेस नेटवर्किंग फोरम (चेअरमन) : दत्ता भालेराव

Advertisement

खाण, खनिजे व ॲग्रिगेट्स समिती (चेअरमन) : राहुल देशमुख

बंदरे, लॉजिस्टिक व वेअरहाऊसिंग समिती (चेअरमन) : सी. एस. सिंग

अन्न प्रक्रिया, दूध आणि दुग्ध व्यवसाय समिती (को-चेअरमन) : वासुदेव भगत

वित्त समिती (को-चेअरमन) : महेंद्र बच्छाव

युवा उद्योजक समिती (को-चेअरमन) : कल्पेश लोया

सदस्यत्व समन्वय समिती (को-चेअरमन) : अंजू सिंघल

शासकीय विभाग समन्वय समिती (को-चेअरमन) : अजय आहुजा

बैठकीत सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

एआय युगात व्यापार-उद्योगाला नवी दिशा देणार : सचिन शहा

"महाराष्ट्र चेंबरच्या नाशिक शाखेच्या चेअरमनपदाची मिळालेली जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. अध्यक्ष रवींद्र मानगावे आणि मार्गदर्शक संतोष मंडलेचा यांनी दाखवलेला विश्वास संपूर्ण टीमला सोबत घेऊन सार्थ ठरवेन. हे संस्थेचे शताब्दी वर्ष असल्याने अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणार आहोत. आजच्या एआय (AI) च्या युगात बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उद्योजक, व्यावसायिक आणि शेतकरी बांधवांना प्रगतीसाठी करून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील."

— सचिन शहा, नवनियुक्त चेअरमन, नाशिक शाखा.

 

Comments

No comments yet.