पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपने खर्च केले तब्बल इतके कोटी... या आकडेवारीने राजकारणात खळबळ...

Share:
Main Image
Last updated: 24-Sep-2026

 

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २४ सप्टेंबर - भारतीय जनता पक्षाने (भाजपा) नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तब्बल ५२९.३८ कोटी रुपयांचा निवडणूक खर्च केल्याची माहिती निवडणूक आयोगाकडे (ECI) सादर केलेल्या अधिकृत अहवालातून समोर आली आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या या धक्कादायक बातमीनुसार, पक्षाने एकूण खर्चाच्या ५४ टक्क्यांहून अधिक म्हणजे तब्बल २८६ कोटी रुपये एकट्या पश्चिम बंगालमधील प्रचारावर उधळले आहेत. 

पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमधील खर्चाची आकडेवारी:

पश्चिम बंगाल: २८६.९९ कोटी रुपये (प्रचारावर २१७.१६ कोटी आणि उमेदवारांवर ६९.८३ कोटी) 

आसाम: ९६.२६ कोटी रुपये

केरळ: ८२.६७ कोटी रुपये

Advertisement

तमिळनाडू: ५१.५६ कोटी रुपये

पुद्दुचेरी: ११.८९ कोटी रुपये 

निवडणुकीनंतर पक्षाच्या तिजोरीत तब्बल ७,६८९ कोटी शिल्लक

अहवालानुसार, निवडणूक कालावधीत पक्षाला १,४९४ कोटी रुपयांचा राजकीय निधी प्राप्त झाला होता. इतका अफाट खर्च केल्यानंतरही पक्षाकडे ७,६८९.०६ कोटी रुपयांचे बँक बॅलन्स आणि रोख रक्कम शिल्लक असल्याचे समोर आले आहे. 

निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या खर्चावर मर्यादा असते, मात्र राजकीय पक्षांच्या एकूण खर्चावर कोणतीही कायदेशीर मर्यादा नसल्याने सत्ताधारी पक्षाने मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर केल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे.

 

Comments

No comments yet.