नाशिकमध्ये तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी... भव्य रोजगार मेळाव्यात ३० हून अधिक कंपन्या येणार...

Share:
Main Image
Last updated: 23-Sep-2026

 

 नाशिक, (प्रतिनिधी) २३ सप्टेंबर - नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी स्थानिक व राज्यातील तरुण-तरुणींपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी 'नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन' (NIMA - निमा) सरसावले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (नाशिक) यांच्या पुढाकाराने आणि 'रोजगार महाकुंभ महाराष्ट्र' अंतर्गत येत्या २९ सप्टेंबर २०२६ रोजी निमा येथे एकदिवसीय भव्य 'रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राइव्ह' आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात नाशिकमधील जास्तीत जास्त उद्योगांनी सहभागी व्हावे, असे आवाहन निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी केले आहे.

उद्योग आणि उमेदवारांना जोडणारा प्रभावी मंच

नाशिक हे महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र असून, येथील ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, फार्मसी व इतर क्षेत्रांमधील उद्योगांना कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाची सातत्याने गरज भासते. दुसरीकडे, शिक्षण व तंत्रशिक्षण पूर्ण केलेल्या असंख्य युवकांना योग्य संधी आणि उद्योगांशी थेट संपर्काची वाट पाहावी लागते. उद्योग आणि नोकरी इच्छुक उमेदवार यांच्यातील ही दरी मिटवून त्यांना एकाच छताखाली आणणे, हा या रोजगार मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील व राज्यातील ३० हून अधिक नामांकित आस्थापना व कंपन्या सहभागी होणार आहेत.

उद्योगांसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य

या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), विविध आस्थापना, विद्यापीठे, महाविद्यालये, पॉलिटेक्निक आणि आयटीआय (ITI) संस्थांना आपली माहिती ऑनलाइन नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

नोंदणी प्रक्रिया: सहभागी होणाऱ्या उद्योगांनी दिलेल्या गुगल फॉर्म (Google Form) द्वारे आपली 'नियोक्ता नोंदणी' (Employer Registration) पूर्ण करावी.

माहिती समाविष्ट करा: नोंदणी करताना संस्थेतील रिक्त पदांची संख्या, उपलब्ध रोजगाराच्या संधी आणि त्यासाठी लागणारे आवश्यक कौशल्य याविषयीची माहिती स्पष्टपणे भरावी.

'निमा'च्या पदाधिकाऱ्यांचे आवाहनामक सूत्र

नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासोबतच स्थानिक तरुण पिढीला सन्मानजनक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व उद्योगांनी या मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असा सूर निमाच्या कार्यकारिणीने आळवला आहे.

हे आवाहन निमाचे अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनीष रावल व किशोर राठी, सचिव राजेंद्र अहिरे, खजिनदार राजेंद्र वडनेरे, सहसचिव किरण पाटील आणि कमिटी चेअरमन गोविंद बोरसे यांनी संयुक्तपणे केले आहे.

 

Comments

No comments yet.