नाशिक शहरातील वाहतुकीत मोठे बदल... 'हे' मार्ग राहणार बंद...

Share:
Main Image
Last updated: 23-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २३ सप्टेंबर - गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी शुक्रवारी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी शहरातील अनेक मुख्य रस्ते सकाळी १० वाजेपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मुख्य विसर्जन मार्ग आणि बंद राहणारे रस्ते:

पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक वाकडी बारव येथून सुरू होऊन दूध बाजार, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉईंट, एम. जी. रोड, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, आणि कपिलेश्वर मंदिरावरून म्हसोबा मैदानाकडे जाईल.

 * बंद राहणारे प्रमुख मार्ग (सकाळी १० वाजल्यापासून):

   * सीबीएस सिग्नल ते अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा आणि दिंडोरी नाका (दोन्ही बाजू)

   * बाईजाबाई छावणी (गोदा पार्क) ते अशोक स्तंभ

   * मॅरेथॉन चौक ते अशोक स्तंभ

   * कात्या मारुती चौक ते गणेशवाडी

   * खडकाळी सिग्नल ते दूध बाजार

Advertisement

   * आनंदवल्ली परिसर: चांडशी गाव ते आनंदवल्ली दरम्यानचा रस्ता घरगुती आणि मंडळ विसर्जनासाठी बंद राहील.

   * नाशिक रोड परिसर: बायटको चौक, शिवाजी महाराज पुतळा, रेल्वे स्टेशन चौक, सुभाष रोड, सत्कार पॉईंट आणि देवळाली गाव गांधी पुतळा ते वालदेवी नदी रस्ता बंद राहील.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग:

१. सीबीएस ते पंचवटी: कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका, रामवाडी, मखमलाबाद नाका आणि दिंडोरी नाकामार्गे प्रवास करावा.

२. सीबीएस ते नाशिक रोड: गडकरी सिग्नल, मुंबई नाका आणि भाभा नगरमार्गे जावे.

३. सीबीएस ते द्वारका/आडगाव: गडकरी सिग्नल, मुंबई नाका, वडाळा नाका आणि द्वारका सर्कल मार्ग वापरावा.

४. चांडशी ते नाशिक: आनंदवल्ली पूल टाळून डाव्या कालव्यातून (चांडशी रोड) मखमलाबाद रोडकडे वळावे.

५. बसेस आणि अवजड वाहने: नाशिक रोड उड्डाणपुलाचा वापर सिन्नर फाट्याकडे जाण्यासाठी करतील. तर देवळाली कॅम्पकडे जाणाऱ्या बसेस जेटवन नगर-जय भवानी रोडवरून विहितगावमार्गे जातील.

नागरिकांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.