पुणे, (प्रतिनिधी) २१ सप्टेंबर - जिओच्या (Jio) यशस्वी १० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या निमित्ताने कंपनीने आपल्या लाखो ग्राहकांसाठी एक मोठी आणि खास ऑफर जाहीर केली आहे. जिओहोमच्या (JioHome) ३० एमबीपीएस आणि १०० एमबीपीएस प्लॅनचा वापर करणाऱ्या ग्राहकांना आता 'अॅमेझॉन प्राइम लाइट'ची (Amazon Prime Lite) १ वर्षाची सदस्यता पूर्णपणे मोफत मिळणार आहे. जिओहोमच्या 'थ्री-इन-वन' (टीव्ही + ओटीटी + वाय-फाय) प्लॅनच्या नवीन तसेच विद्यमान ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय हा फायदा दिला जाणार आहे.
अॅमेझॉन प्राइम लाइट सदस्यतेचे फायदे:
या १ वर्षाच्या मोफत अॅमेझॉन प्राइम लाइट सदस्यतेअंतर्गत ग्राहकांना खालील महत्त्वाच्या सुविधा मिळतील:
प्राइम व्हिडिओ मनोरंजन: अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील हजारो ब्लॉकबस्टर चित्रपट, वेब सीरिज आणि शो पाहण्याची संधी.
मोफत व फास्ट डिलिव्हरी: अॅमेझॉन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करताना पात्र वस्तूंवर (Eligible Orders) मोफत आणि जलद डिलिव्हरीची (Fast Delivery) सुविधा.
ऑफर 'अशी' करा ॲक्टिव्हेट:
ही विशेष ऑफर १९ सप्टेंबर २०२६ पासून टप्प्याटप्प्याने सुरू झाली असून पुढील दोन आठवड्यांत या सर्व प्लॅनधारकांपर्यंत पोहोचेल. ही सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांनी खालील सोप्या स्टेप्स फॉलो कराव्यात:
१. मोबाईलमधील MyJio ॲप ओपन करा.
२. होमपेजवर दिसणाऱ्या 'Amazon Prime Lite Offer' च्या बॅनरवर क्लिक करा.
३. बॅनरवर टॅप करताच १ वर्षाची मोफत सदस्यता लगेच ॲक्टिव्हेट होईल.
(टीप: सदस्यता ॲक्टिव्हेट केल्याच्या दिवसापासून पुढील १२ महिन्यांसाठी हा लाभ ग्राहकांना मोफत मिळेल.)
इतर प्लॅन्सबाबत महत्त्वाचे:
दरम्यान, जिओच्या ₹८८८, ₹१,१९९ तसेच १५० एमबीपीएस किंवा त्याहून अधिक स्पीड असलेल्या प्रीमियम प्लॅनच्या ग्राहकांना आधीपासूनच २४ महिन्यांचा (२ वर्षे) अॅमेझॉन प्राइम लाइट लाभ मिळत आहे. या ग्राहकांसाठीच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून त्यांचा हा लाभ पूर्ववत सुरू राहणार असल्याचे जिओने स्पष्ट केले आहे.