एसटीच्या NCMC कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल... प्रवाशांना दिलासा की?

Share:
Main Image
Last updated: 20-Sep-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २० सप्टेंबर - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) प्रकल्पांतर्गत सवलतधारक प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांसाठी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी एसटी महामंडळाने काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

प्रक्रियेतील प्रमुख बदल व महत्त्वाचे निर्णय:

बायोमेट्रिक जुळत नसल्यास OTP चा पर्याय:

ज्या अमृत ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे (बायोमेट्रिक) जुळण्यात अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी २१ सप्टेंबर २०२६ पासून आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर प्राप्त होणाऱ्या OTP द्वारे NCMC कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हरवलेले किंवा चोरीला गेलेले कार्ड पुन्हा मिळणार:

२१ सप्टेंबर २०२६ पासून हरवलेले किंवा चोरीला गेलेले NCMC कार्ड ब्लॉक करून, केवळ ₹१९९ शुल्क भरून नवीन कार्डसाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध होईल.

२५ सप्टेंबरपासून कार्डचे वितरण:

Advertisement

ज्या लाभार्थ्यांनी १९ सप्टेंबर २०२६ पर्यंत NCMC कार्डसाठी नोंदणी केली आहे, त्यांना २५ सप्टेंबर २०२६ पासून कार्ड वितरण सुरू करण्यात येईल.

QR कोड पावतीद्वारे सवलतीचे तिकीट:

१६ सप्टेंबर २०२६ पासून नोंदणी करणाऱ्या सवलतधारकांना QR कोड असलेली नोंदणी पावती दिली जात आहे. एसटीच्या ईटीआयएम (ETIM) मशीनवर ही पावती स्कॅन करून सवलतीचे तिकीट तात्काळ मिळवता येईल. ही पावती ३० दिवसांपर्यंत वैध राहील.

कार्ड ॲक्टिव्हेशन व टॉप-अप आवश्यक:

नोंदणी केलेल्या सर्व लाभार्थ्यांनी नोंदणीनंतर ३० दिवसांच्या आत आपले NCMC कार्ड Active करून त्यात Top-up करणे बंधनकारक आहे, जेणेकरून सवलतीचा प्रवास विनाखंड सुरू राहील.

सर्व सवलतधारकांना तातडीने नोंदणीचे आवाहन

एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ डिजिटल, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मिळवण्यासाठी सर्व संबंधित अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिला सवलतधारकांनी लवकरात लवकर NCMC कार्ड नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाच्या जनसंपर्क शाखेतर्फे करण्यात आले आहे.

?s=20

Comments

No comments yet.