तृतीयपंथीयांसाठी हा आहे नॅशनल हेल्पलाईन क्रमांक

Share:
Main Image
Last updated: 18-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १८ जानेवारी - केंद्र शासनाचा तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा  व नियम देशात लागू झाला आहे. तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींसठी केंद्र शासनामार्फत स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले असून  तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रारींचे निवारणासाठी नॅशल हेल्पलाईन क्रमांक 14427 कार्यान्वित करण्यात आला आहे. तृतीयपंथीय व्यक्तींनी या हेल्पलाईन क्रमांकाचा उपयोग करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नाशिक देविदास नांदगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले  आहे.

Advertisement

तसेच ज्या तृतीयपंथीयांनी अद्याप नोंदणी केली  नाही अशांनी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर्स पोर्टलवर  https://transgender.dosje.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. अथवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक सामाजिक न्याय भवन, नाशिक पुणे रोड, नाशिक कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त नांदगावकर यांनी केले आहे.

Comments

No comments yet.