कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, दोन जखमी

Share:
Last updated: 17-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ जानेवारी - भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात छत्रपती संभाजीरोडवरील ओढागाव शिवारात झाला. या अपघातात ट्रिपलसीट प्रवास करणारे अन्य दोन तरूणही जखमी झाले असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पसार झालेल्या कारचालका विरोधाता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रितेश बाळू सुर्यवंशी (२३ रा. पेठकर प्लाझा, पेठनाका) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून या अपघातात परमेश्वर उर्फ प्रमोद शिवाजी शिंदे व प्रकाश चंद्रकात जाधव हे दोघे मित्र जखमी जाले आहेत. याबाबत निलेश गरूड (रा.पेठनाका) यांनी फिर्याद दिली आहे. सुर्यवंशी व त्याचे जखमी दोन मित्र गुरूवारी (दि.१५) कामानिमित्त निफाड येथे गेले होते. काम आटोपून तिघे मित्र या दुचाकीवर ट्रिपलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. छत्रपती संभाजी रोडवरील ओढा शिवारातून तिघे मित्र दुचाकीने आपल्या घराकडे जात असतांना बंद पडलेल्या साईनाथ हॉटेल समोर पाठीमागून भरधाव आलेल्या गाडीने दुचाकीस धडक दिली. या अपघातात तिघे मित्र गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांनी त्यांना तातडीने नजीकच्या चित्तेगाव फाटा येथील गुरूकृपा हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ. राजेंद्र शिलावत यांनी रितेश सूर्यवंशी यास तपासून मृत घोषित केले. या अपघाताचा तपास हवालदार अहिरे करीत आहेत.

विषारी औषध पिऊन आत्महत्या

नाशिक : कोनार्क नगर भागात राहणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रविण माधवराव सातपुते (५३ रा.माधवपुष्प रो हाऊस कोनार्क नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सातपुते यांनी गेल्या शनिवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना मखमलाबादरोडवरील साई समर्थ हॉस्पिटल येथे दाखल केले होते. गेली सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू असतांना शुक्रवारी (दि.१६) सायकाळी डॉ. समिर आहिरे यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. डॉ. ऋषभ कुहिरे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास जमादार जाधव करीत आहेत.

 

Advertisement

Comments

No comments yet.