CRPF जवानांना आत्महत्येचा विळखा... ही आकडेवारी वाचून तुम्हालाही बसेल धक्का...

Share:
Main Image
Last updated: 13-Sep-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १३ सप्टेंबर - केंद्रीय राखीव पोलीस दलातील (CRPF) जवानांच्या वाढत्या आत्महत्येच्या घटनांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. १ जानेवारी ते २२ मे २०२६ या अवघ्या पाच महिन्यांत १९ जवानांनी आत्महत्या केल्याच्या वृत्ताच्या आधारे आयोगाने स्वतःहून (Suo Moto) कारवाई सुरू केली आहे.

याप्रकरणी मानवाधिकार आयोगाने केंद्रीय गृह मंत्रालयाचे गृह सचिव आणि सीआरपीएफच्या महासंचालकांना नोटीस बजावून दोन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

'जगण्याच्या अधिकारा'चे उल्लंघन: देशातील सर्वात मोठ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांचे अशा प्रकारे मृत्यू होणे हे त्यांच्या मूलभूत 'जगण्याच्या अधिकाराचे' गंभीर उल्लंघन असल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे.

२०२५ मधील उच्चांकी नोंद: उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२५ या वर्षात सीआरपीएफच्या ५९ जवानांनी आत्महत्या केली होती. ही गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक संख्या आहे.

Advertisement

पाच वर्षांतील गंभीर आकडेवारी (२०२१-२०२५):

एकूण आत्महत्या: गेल्या पाच वर्षांत एकूण २८१ जवानांनी जीवनयात्रा संपवली.

कर्तव्यावर असताना मृत्यू: यातील सुमारे २१६ जवान कर्तव्यावर कार्यरत असताना आत्महत्येचे बळी ठरले.

वर्षनिहाय मृत्यू: २०२१ (५७), २०२२ (४३), २०२३ (५७), २०२४ (४६) आणि २०२५ (५९).

Comments

No comments yet.