नवी मुंबई, (प्रतिनिधी) ११ सप्टेंबर - भारतीय कला, संस्कृती आणि जगातील नामांकित सांस्कृतिक कार्यक्रमांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'ने (NMACC) आपल्या यशाचा नवा टप्पा गाठला आहे. मार्च २०२३ मध्ये सुरू झालेल्या या सेंटरमध्ये गेल्या तीन वर्षांत तब्बल ३,५०० हून अधिक शो सादर झाले असून, जगभरातील २५ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी या कलाकृतींचा आनंद घेतला आहे.
"भारताचे सर्वोत्कृष्ट जगभरात पोहोचवणे आणि जगातील सर्वोत्तम कला भारतात आणणे," या NMACC च्या संस्थापक नीता अंबानी यांच्या संकल्पनेला या उपक्रमातून मोठे यश मिळाले आहे.
तीन वर्षांतील महत्त्वाचे टप्पे व वैशिष्ट्ये:
कलाकारांचा भरगोस सहभाग: १५ हून अधिक भाषांमध्ये १०,५०० पेक्षा जास्त कलाकारांनी NMACC च्या विविध व्यासपीठांवर आपली कला सादर केली आहे.
भव्य भारतीय व आंतरराष्ट्रीय शो:
भारतीय कलाकृती: 'मुघल-ए-आझम: द म्युझिकल', 'राजाधिराज: लव्ह. लाइफ. लीला' आणि स्वतःची निर्मिती असलेला 'द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन'.
आंतरराष्ट्रीय शो: 'द साऊंड ऑफ म्युझिक', 'वेस्ट साईड स्टोरी', 'MAMMA MIA!', 'द फॅंटम ऑफ द ओपेरा' आणि 'Wicked' यांसारख्या जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शोचे मुंबईत सादरीकरण झाले.
अत्याधुनिक पायाभूत सुविधा: NMACC मध्ये २,००० आसनांचे भव्य 'ग्रँड थिएटर', १९८ आसनांचे 'स्टुडिओ थिएटर', ८० आसनांचे 'द क्यूब' आणि चार मजली 'आर्ट हाऊस' उपलब्ध आहे.
सार्वजनिक कला आणि हस्तकला: सेंटरच्या परिसरात ५६ फूट उंचीचे 'कमल कुंज', घुंगरूंपासून साकारलेली मुंबईची स्कायलाइन आणि यायोई कुसामा यांची 'Clouds' ही कलाकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या 'स्वदेश' उपक्रमाद्वारे भारतीय पारंपरिक हस्तकलेलाही प्रोत्साहन दिले जात आहे.
जागतिक विस्तार आणि आगामी आकर्षणे
NMACC आता मुंबईपुरते मर्यादित न राहता जागतिक स्तरावर विस्तारत आहे. ६१ व्या 'व्हेनिस बिएनाले' मधील इंडिया पॅव्हिलियनच्या सादरीकरणात NMACC सहभाग नोंदवत आहे. तसेच, आगामी काळात 'द ग्रेट इंडियन म्युझिकल'चे पुनरागमन, प्रसिद्ध ब्रॉडवे शो 'Chicago' आणि ऑस्कर-नामांकित संगीतकार मॅक्स रिक्टर यांचे भारतातील पहिलेच सादरीकरण NMACC मध्ये प्रस्तावित आहे.