एसयूव्ही विश्वात नवा धमाका... किआ सोरेंटो भारतात दाखल... पहिल्यांदाच हायब्रिड इंजिनसह मिळणार...

Share:
Main Image
Last updated: 07-Sep-2026

पुणे, (प्रतिनिधी) ७ सप्टेंबर - किआ इंडियाने प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमध्ये मोठी घोषणा करत आपली बहुप्रतिक्षित 'किआ सोरेंटो' (Kia Sorento) सादर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. 'भारतासाठी, भारतात निर्मित' (Made for India) या संकल्पनेवर आधारित ही एसयूव्ही शक्तिशाली 'स्मार्टस्ट्रीम' पॉवरट्रेन, प्रगत तंत्रज्ञान, सेगमेंट-फर्स्ट फिचर्स आणि सर्वोत्कृष्ट सुरक्षिततेने सुसज्ज असून ती भारतीय बाजारपेठेत एसयूव्हीचा अनुभव नव्याने व्याख्यायित करणार आहे.

किआचे भारतातील पहिले हायब्रिड इंजिन व ऑल-व्हील ड्राइव्ह

सोरेंटोच्या माध्यमातून किआ भारतात प्रथमच हायब्रिड इंजिन आणत आहे. या एसयूव्हीमध्ये ग्राहकांना हायब्रिड आणि डिझेल असे दोन सक्षम पर्याय मिळतील:

१.६ लिटर टर्बो जीडीआय हायब्रिड: हे इंजिन ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह १८० पीएस पॉवर आणि २६५ Nm टॉर्क निर्माण करते. याला ६५ पीएस पॉवर व २६४ Nm टॉर्क देणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरची जोड देण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये ऑल-व्हील ड्राइव्हसह (AWD) हायब्रिड पॉवरट्रेन देणारी सोरेंटो ही पहिलीच कार ठरली आहे.

डी२.२ लिटर डिझेल इंजिन: हे स्मार्टस्ट्रीम इंजिन ८-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशनसह (DCT) १९३ पीएस पॉवर आणि ४४२ Nm चा प्रचंड टॉर्क जनरेट करते.

यात विविध रस्त्यांच्या परिस्थितीसाठी इको, नॉर्मल, स्मार्ट, स्पोर्ट्स या ड्रायव्हिंग मोड्ससह स्नो, सँड आणि मड हे विशेष टेरेन मोड्स (Terrain Modes) ऑल-व्हील ड्राइव्ह पर्यायामध्ये उपलब्ध करून दिले आहेत.

सुरक्षिततेचा नवा स्तर: ADAS लेव्हल २+ आणि १० एअरबॅग्स

किआच्या प्रगत 'N3' प्लॅटफॉर्मवर आधारित सोरेंटोमध्ये सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला आहे. यातील मुख्य सुरक्षा वैशिष्ट्ये:

Advertisement

३० ऑटोनॉमस ड्रायव्हर-सहाय्य फीचर्स: यात हायवे ड्रायव्हिंग असिस्ट, नेव्हिगेशन-आधारित स्मार्ट क्रूझ कंट्रोल, फॉरवर्ड कॉलिजन-अॅव्हॉयडन्स आणि लेन कीपिंग असिस्टचा समावेश आहे.

कमाल सुरक्षा पॅकेज: स्टँडर्ड म्हणून ७ एअरबॅग्स, तर टॉप व्हेरिएंटमध्ये तब्बल १० एअरबॅग्स मिळतील.

३६०-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, १२ पार्किंग सेन्सर्स आणि ५ रडारमुळे चालकाला संपूर्ण परिसराची अचूक माहिती मिळते.

सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच दिलेले 'रिमोट स्मार्ट पार्किंग असिस्ट' (RSPA), शिफ्ट-बाय-वायर आणि पॅडल शिफ्टर्समुळे ड्रायव्हिंग आणि पार्किंग अत्यंत सुलभ होणार आहे.

भारतीय प्रवाशांसाठी खास रचना आणि केबिन कम्फर्ट

भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन या कारमध्ये विशेष बदल करण्यात आले आहेत. बाहेरील बाजूस भारत-विशिष्ट ग्रिल डिझाइन आणि ब्लॅक हाय-ग्लॉसी ब्रिज टाईप रुफ रेल्स देण्यात आले आहेत. केबिन शांत ठेवण्यासाठी अकुस्टिक विंडशील्ड आणि डोअर ट्रिम इन्सुलेटर वापरल्याने बाहेरील आवाज (NVH) आत येत नाही. लांबच्या प्रवासासाठी दुसऱ्या रांगेत अनुकूल अँगल असलेल्या सीट्स आणि व्हेंटिलेटेड सीट्सची सुविधा प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर बनवते.

८ आकर्षक रंग आणि खास 'ब्लॅक लाईन' एडिशन

किआ सोरेंटो हायब्रिड व डिझेल या दोन्ही प्रकारांत (ऑप्शन पॅकसह) ३ मुख्य ट्रिम्समध्ये उपलब्ध असेल. ग्राहकांना ग्लॅशियर व्हाईट पर्ल, ग्रॅव्हिटी ग्रे, मॅग्मा रेड, प्युटर ऑलिव्ह, ऑरोरा ब्लॅक पर्ल, इम्पेरिअल ब्लू, आयव्हरी सिल्व्हर ग्लॉस आणि मॅट डार्क गन मेटल या ८ मोनो-टोन रंगांची निवड करता येईल.

तसेच, किआ इंडियाने प्रथमच या मॉडेलमध्ये 'ब्लॅक लाईन' (Black Line) ही विशेष ट्रिम आणली आहे. यात ब्लॅक-आऊट लोगो, १९-इंच क्रिस्टल कट अलॉय व्हील्स, फेंडर गार्निश आणि बेल्टलाईन अशा स्पोर्टी आणि डार्क घटकांमुळे कारला एक आक्रमक व अत्यंत लक्झरी लुक मिळतो.

Comments

No comments yet.