चाकणच्या समस्या राज्यभर गाजताच २ दिवसात... असे सुरू आहे युद्धपातळीवर...

Share:
Main Image
Last updated: 30-Aug-2026

पुणे, (प्रतिनिधी) ३० ऑगस्ट - तळेगाव-चाकण-शिक्रापूर (रा.म.-५५) राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-डी या औद्योगिक पट्ट्यातील अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरील खड्ड्यांमुळे चालकांची होणारी दैना आता थांबणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना आणि एमआयडीसीतील वाहतुकीला दिलासा देण्यासाठी प्रशासनाने ४० किमी रस्त्याची दुरुस्ती अवघ्या दोन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

एकूण ५४ किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून प्रत्यक्ष कामाला गती देण्यात आली आहे.

कामकाजाचे नियोजन व महत्त्वाचे मुद्दे:

४० किमी रस्ता २ दिवसांत दुरुस्त:

तुलनेने कमी खराब झालेल्या ४० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे खड्डे बुजवून दुरुस्तीचे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण केले जाईल.

MIDC पट्ट्यातील १४ किमी रस्ता ४ दिवसांत:

Advertisement

तळेगाव व चाकण औद्योगिक क्षेत्रातील १४ किलोमीटर रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने तेथील खड्डे बुजवणे आणि साईड शोल्डरची दुरुस्ती पुढील चार दिवसांत पूर्ण केली जाईल.

१२ किमी रस्त्याचे रुंदीकरण २ महिन्यांत:

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या मार्गावरील १२ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

कायमस्वरूपी दर्जा सुधारणार (MSIDC):

रस्त्याच्या कायमस्वरूपी सुशोभीकरण व दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (MSIDC) पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

अडथळ्यांवर मात:

विविध सेवा वाहिन्यांचे (Utility Lines) अडथळे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे डांबर मिळण्यात आलेल्या अडचणी दूर करून आता काम गतीने सुरू आहे.

Comments

No comments yet.