पुरातन शिल्पकला नैसर्गिक रंगात फुलणार... औंढा नागनाथ अन् कल्याणेश्वर मंदिर परिसराचा असा होणार कायापालट...

Share:
Main Image
Last updated: 30-Aug-2026

अक्षय काळे, (मुंबई) ३० ऑगस्ट - १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ मंदिराचे पुरातन वैभव जपतानाच तेथील शिल्पकला नैसर्गिक रंगसंगतीत साकारावी आणि परिसरातील कामे अत्यंत दर्जेदार करावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत औंढा नागनाथ मंदिराच्या १९३.५५ कोटी तर नागपूर येथील ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिराच्या ७२.४९ कोटींच्या सुधारित विकास आराखड्याला अंतिम मान्यता देण्यात आली. याशिवाय, पुण्याजवळील आंबेगाव येथील 'शिवसृष्टी' थीम पार्कच्या चौथ्या टप्प्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार संतोष बांगर, प्रवीण दटके आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विकास आराखड्यांची मुख्य वैशिष्ट्ये:

१. श्री क्षेत्र औंढा नागनाथ मंदिर विकास (१९३.५५ कोटी रु.):

स्थापत्य जतन व संवर्धन: नंदी मंडप, ओवरी, दर्शन बारी आणि ऐतिहासिक हरीहर तलावाचे जीर्णोद्धार व संवर्धन.

भाविकांसाठी सुविधा: २५०० क्षमतेचा आधुनिक प्रतीक्षा कक्ष, नवीन भक्त निवास, माहिती केंद्र व जलद दर्शन रांगेचे नियोजन.

Advertisement

इतर आकर्षणे: परिसरात सापडलेल्या जुन्या प्राचीन मूर्तींसाठी विशेष म्युझियम, उद्यान विकास, बाह्य रोषणाई आणि सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा.

२. कल्याणेश्वर मंदिर परिसर, नागपूर (७२.४९ कोटी रु.):

हेमाडपंथी स्थापत्यशैली: मंदिराचे हेमाडपंथी शैलीनुसार सुशोभीकरण आणि नवीन शिखराचे बांधकाम.

सुविधा व पायाभूत संरचना: भव्य सभामंडप, बहुउद्देशीय सभागृह, महाप्रसाद गृह, वेदशाळा, योगशाळा आणि दोन स्तरांवरील तळघर (Basement Parking).

बदल: यांत्रिक पार्किंगऐवजी साध्या व व्यवहार्य वाहनतळाची सुधारित रचना.

३. आंबेगाव येथील 'शिवसृष्टी' थीम पार्क (५० कोटी रु.):

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर आधारित आशियातील वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक थीम पार्कच्या चौथ्या टप्प्यातील कामासाठी ५० कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे.

?s=20

Comments

No comments yet.