वाहन ट्रान्सफर करणे झाले आणखी सोपे... पण 'ही' अट बंधनकारक...

Share:
Main Image
Last updated: 27-Aug-2026

अक्षय काळे, (मुंबई) २७ ऑगस्ट - देशभरात वाहनांचे मालकी हक्क हस्तांतरण (Ownership Transfer) आणि ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने एकसमान ऑनलाइन कार्यप्रवाह लागू केला आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी आता वाहन मालकांचे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) अनिवार्य करण्यात आले आहे.

नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांकात तफावत असल्यास काय करावे?

वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील (RC) नाव आणि आधार कार्डवरील नाव यात फरक आढळल्यास ऑनलाइन प्रणालीमध्ये “Please visit aadhar center to update the pin code or visit RTO/apply using mobile authentication, to avail contactless services. Name is not matching in vahan and aadhar.” असा मेसेज दिसेल.

वाहन मालकांनी खालील गोष्टी तातडीने पूर्ण कराव्यात:

Advertisement

नाव जुळवणे आवश्यक: आधार कार्डवरील नाव वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणेच (RC) अद्ययावत (Update) करून घ्यावे.

माहिती अद्ययावत करणे: नावातील फरक दूर झाल्यानंतर 'वाहन-४.०' प्रणालीमध्ये दुरुस्ती करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.

संपादित सेवा: आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच मालकी हक्क हस्तांतरण किंवा NOC साठी ऑनलाइन अर्ज सादर करता येईल.

प्रशासनाचे आवाहन:

वाहनविषयक सर्व प्रकारच्या सुविधांचा पारदर्शक, सुरळीत आणि संपर्करहित (Contactless) पद्धतीने लाभ घेण्यासाठी सर्व वाहनधारकांनी आपल्या आधार कार्डवरील नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवावा, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (आय.टी.) शैलेश कामत यांनी केले आहे.

Comments

No comments yet.