युवतींना मिळणार इतक्या हजारांचा पॉकेट मनी... मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती...

Share:
Main Image
Last updated: 26-Aug-2026

अक्षय काळे, (मुंबई) २६ ऑगस्ट - विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग विधायक कामांसाठी करत सामाजिक जाणीव जोपासावी. स्वतःची आवड आणि क्षमता ओळखून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले. मंत्रालयात आयोजित विशेष संवादादरम्यान त्यांनी मुंबईतील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांशी तब्बल दोन तास मनमोकळी चर्चा केली.

संवादातील महत्त्वाचे मुद्दे:

मुलींसाठी पॉकेट मनी: मुलींना उच्च शिक्षण घेताना आर्थिक आधार आणि आत्मविश्वास देण्यासाठी त्यांना दरमहा २,००० रुपये 'पॉकेट मनी' उपलब्ध करून देण्याबाबत विद्यापीठ, महाविद्यालये व शिक्षण विभागाचे संयुक्त प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

इंटर्नशिप व ऐतिहासिक वारसा: प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षणासाठी इंटर्नशिपच्या संधी व्यापक केल्या जातील. तसेच इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वास्तू आणि सांस्कृतिक ठेव्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शैक्षणिक धोरण व संवाद: विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीबाबत आपले अनुभव मांडले. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांशी नियमित संवाद ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह खालसा, रुईया आणि सिद्धार्थ महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

No comments yet.