अक्षय काळे, (मुंबई) २६ ऑगस्ट - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने आपल्या संघटन रचनेत मोठे फेरबदल केले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या ३७ विविध प्रकोष्ठांच्या (Cells) प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारींची नवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षातील ज्येष्ठ आमदार, माजी खासदार, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील नव्याने दाखल झालेल्या दिग्गज दिग्गजांना संधी देण्यात आली आहे.
माजी क्रिकेटपटू केदार जाधवला 'क्रीडा' विभागाची कमान
या जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश केलेले माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्याकडे 'क्रीडा प्रकोष्ठ'च्या प्रभारीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. याशिवाय सहकार क्षेत्रात आमदार प्रवीण दरेकर, वैद्यकीय क्षेत्रात माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि सांस्कृतिक क्षेत्रात मंत्री आशिष शेलार यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांकडे पक्षाने प्रकोष्ठांची जबाबदारी दिली आहे.
प्रमुख प्रकोष्ठांचे नवनियुक्त प्रभारी:
सहकार प्रकोष्ठ: आ. प्रवीण दरेकर
सांस्कृतिक प्रकोष्ठ: आशिष शेलार
वैद्यकीय प्रकोष्ठ: डॉ. भारती पवार
क्रीडा प्रकोष्ठ: केदार जाधव
उद्योग प्रकोष्ठ: आ. अरुण लखानी
विधी प्रकोष्ठ: ॲड. भूषण महाडिक
बुद्धिजीवी प्रकोष्ठ: विश्वास पाठक
जैन समाज प्रकोष्ठ: मंगलप्रभात लोढा
आयुष्मान भारत प्रकोष्ठ: डॉ. सुजय विखे पाटील
भटके-विमुक्त प्रकोष्ठ: गोपीचंद पडळकर
दिव्यांग प्रकोष्ठ: डॉ. भागवत कराड (प्रभारी), जयसिंग चव्हाण (सहप्रभारी)
अभियंता प्रकोष्ठ: आ. प्रशांत ठाकूर
मीडिया प्रकोष्ठ: केशव उपाध्ये
सोशल मीडिया प्रकोष्ठ: श्वेता शालिनी
आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ: तुषार भोसले
संघटन अधिक मजबूत करण्याचा मानस
पक्षाच्या सर्व स्तरांतील घटकांना, विविध व्यावसायिक क्षेत्रांना आणि समाजातील सर्व घटकांना थेट पक्षाशी जोडण्यासाठी हे ३७ प्रकोष्ठ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. या नियुक्त्यांच्या माध्यमातून भाजपने आगामी निवडणुकांसाठी आपल्या संघटनात्मक तटबंदीची बांधणी अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.