अक्षय काळे, (मुंबई) २६ ऑगस्ट - महाराष्ट्रभरातील वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्य परिवहन विभागाने वाहनांच्या वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC - Pollution Under Control) तपासणी शुल्कात मोठी सुधारणा केली आहे. परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून राज्यातील सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांवर हे नवीन दर लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दिनांक २७ एप्रिल २०२२ च्या जुन्या दरपत्रकात सुधारणा करून आता नवीन वाढीव दर लागू करण्यात आले आहेत.
असे आहेत सुधारित नवीन दर (वाढीव दरपत्रक)
परिपत्रकानुसार वाहनांच्या वर्गवारीनुसार सध्याचे आणि नवीन प्रस्तावित वाढीव दर खालीलप्रमाणे आहेत:
डिझेलवर चालणारी वाहने (Diesel Vehicles)
प्रशासनाचे PUC केंद्र मालकांना कडक निर्देश
वाहनांची तपासणी करताना पारदर्शकता राहावी आणि वाहनधारकांची फसवणूक होऊ नये, यासाठी परिवहन विभागाने पुढील सूचना दिल्या आहेत:
दरपत्रक लावणे बंधनकारक: सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्र मालकांनी सुधारित शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात ठळकपणे प्रदर्शित करणे सक्तीचे आहे.
अधिक शुल्क आकारल्यास कारवाई: विहित दरांपेक्षा जास्त शुल्क आकारले जाणार नाही याची खातरजमा करण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
'वायुवेग पथका'ची नजर: सुधारित दरांनुसारच अंमलबजावणी होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी परिवहन कार्यालयातील 'वायुवेग पथका'ला (Flying Squad) अचानक तपासणी व आवश्यक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
"सर्व प्रादेशिक व उप-प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (RTO) आपापल्या क्षेत्रातील पीयूसी केंद्रांना या दरांची माहिती देऊन मीडियाद्वारे जनतेत व्यापक प्रसिद्धी द्यावी."
— राजेश नार्वेकर (परिवाहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य)