अनाथ झालेल्या भावा-बहिणींची जबाबदारी पालकमंत्र्यांनी स्वीकारली... खात्यात जमा केले इतके लाख...

Share:
Main Image
Last updated: 25-Aug-2026

सांगली, (प्रतिनिधी) २५ ऑगस्ट -  कुपवाड येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या केसरेकर दाम्पत्याच्या दोन्ही मुलांची सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. या दुःखाच्या प्रसंगी शासन व प्रशासन मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, दोन्ही मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणा:

शैक्षणिक व वसतिगृह खर्च: दोन्ही मुलांना आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात प्रवेश देऊन त्यांच्या वसतिगृहाचा (Hostel) संपूर्ण खर्च केला जाईल.

आर्थिक मदत:

 मुलांच्या शैक्षणिक व दैनंदिन खर्चासाठी त्यांच्या बँक खात्यात तात्काळ १ लाख रुपये जमा करण्यात आले असून, आवश्यकतेनुसार पुढेही आर्थिक मदत दिली जाईल.

Advertisement

१५ दिवसांत चार्जशीट: दोषींवर १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र (Charge-sheet) दाखल करण्याचे कडक निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत.

फास्ट ट्रॅक खटला: ही केस नियमितपणे चालवून दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांशी चर्चा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांना देण्यात आल्या.

स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिकेचा पुढाकार:

या भेटीदरम्यान सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीही या दोन्ही मुलांच्या आर्थिक मदतीची सामूहिक जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले.

याप्रसंगी खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह अन्य मान्यवर व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

?s=20

Comments

No comments yet.