विद्यार्थ्यांना मोठा दिलासा... नवी मुंबईमध्ये सरकारी हॉस्टेल उपलब्ध... असा घ्या लाभ...

Share:
Main Image
Last updated: 22-Aug-2026

नवी मुंबई, (प्रतिनिधी) २२ ऑगस्ट - इतर मागासवर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) तसेच विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने मुंबई शहर जिल्ह्यासाठी विशेष शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. हे वसतिगृह वाशी, नवी मुंबई (सेक्टर १९ ब, प्लॉट क्र. ९, पहिला मजला) येथे कार्यरत झाले आहे.

प्रवेश प्रक्रिया आणि नियम (शैक्षणिक वर्ष २०२६-२७):

प्रवेशाची पात्रता: विहित मुदतीत अर्ज करणाऱ्या व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहात प्रवेश दिला जाईल.

द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्ष प्रवेश: पदविका उत्तीर्ण होऊन पदवीच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच उर्वरित रिक्त जागांवर अनुक्रमे तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. या प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांच्या १२ वीच्या अंतिम निकालातील गुण विचारात घेतले जातील.

प्रवर्गनिहाय आरक्षण रचना:

इतर मागासवर्ग (OBC): ५१%

Advertisement

विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT): ३३%

विशेष मागास प्रवर्ग (SBC): ६%

दिव्यांग विद्यार्थी: ४%

आर्थिक मागास प्रवर्ग (EWS): ४%

अनाथ विद्यार्थी: २%

संपर्क व अधिक माहिती:

वसतिगृह प्रवेशाच्या अटी व शर्तींसंदर्भातील अधिक माहितीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी ‘सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर, नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर. सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई’ येथे संपर्क साधावा.

Comments

No comments yet.