ईपीएफओची मोठी भेट... मिळणार पीएफ आणि पेन्शनचा लाभ...

Share:
Main Image
Last updated: 20-Aug-2026

पुणे, (प्रतिनिधी) २० ऑगस्ट - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ‘कर्मचारी नोंदणी अभियान (EEC), 2026’ ची घोषणा केली आहे. १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत भविष्य निर्वाह निधीच्या (EPF) सामाजिक सुरक्षा कवचापासून वंचित राहिलेल्या पात्र कर्मचाऱ्यांची स्वेच्छेने नोंदणी करण्यासाठी नियोक्त्यांना (Employers) ही एक विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे अभियान १ जुलै २०२६ पासून सुरू झाले असून ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि सवलती:

कालावधी: १ जुलै २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ (१ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०२६ दरम्यानच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू).

कर्मचारी हिश्शात सवलत: जर कर्मचाऱ्याच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीचा हिस्सा कापण्यात आला नसेल, तर या अभियानांतर्गत कर्मचाऱ्याचा तो हिस्सा पूर्णपणे माफ केला जाईल.

Advertisement

नियोक्त्यांची जबाबदारी: नियोक्त्याला स्वतःचा हिस्सा, लागू असलेले व्याज, प्रशासकीय शुल्क आणि केवळ ₹१०० ची एकरकमी भरपाई भरणे आवश्यक असेल.

डिजिटल नोंदणी सुविधा: EPFO च्या नियोक्ता पोर्टलद्वारे ऑनलाइन घोषणापत्र सादर करून ही नोंदणी करता येईल.

आधुनिक तंत्रज्ञान: या प्रक्रियेत चेहऱ्याच्या ओळखीवर (Face Recognition) आधारित 'सार्वत्रिक खाते क्रमांक' (UAN) तयार केला जाईल. तसेच इलेक्ट्रॉनिक विवरणपत्रासोबत तात्पुरते विवरणपत्र संदर्भ क्रमांक (TRRN) संलग्न करून प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि इतर सामाजिक सुरक्षा कवच मिळवून देण्यासाठी सर्व पात्र नियोक्त्यांनी या योजनेचा वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहन ईपीएफओ प्रादेशिक कार्यालय (विमान नगर, पुणे) द्वारे करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.