मुंबई, (प्रतिनिधी) १९ ऑगस्ट - भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या दोन महत्त्वाच्या आघाड्यांच्या प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाचा जनाधार अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने 'ओबीसी मोर्चा' आणि 'भटके विमुक्त जमाती प्रकोष्ठ' (सेल) या दोन्ही विभागांत राज्यातील विविध भागांतील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.
ओबीसी मोर्चाची नवीन कार्यकारिणी
भाजपा प्रदेश सरचिटणीस व ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी आमदार योगेश सागर आणि ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली.
उपाध्यक्ष: मनोज भुजबळ (रायगड), गजानन कोल्हे (अमरावती) आणि शरद पाटील (हिंगोली).
सरचिटणीस: विनोद दळवी, विक्रांत चांदवडकर आणि शितल शिंदे.
कोषाध्यक्ष: मनोज ब्राह्मणकर.
भटके विमुक्त जमाती प्रकोष्ठची घोषणा
भाजपा प्रदेश सरचिटणीस व भटके विमुक्त प्रकोष्ठचे प्रभारी राजेश पांडे आणि प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या कार्यकारिणीची घोषणा केली.
प्रदेश सह-संयोजक: राजू साळूंके (रायगड), शिवाजी आव्हाड (ठाणे) आणि पी.टी. चव्हाण (बीड).
कार्यकारिणी सदस्य: अमोल बावणे (नाशिक), राजेश धोत्रे (पुणे) आणि बाबुराव (तुळशिराम) केंद्रे (नांदेड).
कार्यालय प्रमुख: राजेंद्र गोसावी.
या नियुक्त्यांमुळे आगामी काळात संबंधित घटकांमध्ये पक्षाचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.