मुंबई,(प्रतिनिधी) १९ ऑगस्ट- भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाची नवी प्रदेश कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार, भाजपाचे प्रदेश सरचितणीस व किसान मोर्चाचे प्रभारी आमदार संजय कुटे तसेच किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी या कार्यकारिणीची घोषणा केली.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील धडपडणाऱ्या आणि अभ्यासू नेत्यांना संघटन बळकट करण्यासाठी या नव्या कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची यादी:
उपाध्यक्ष:
रचना गहाणे (गोंदिया)
दादा सातव (पुणे)
अशोक खेडकर (अहिल्यानगर)
प्रदेश सरचिटणीस:
रंगनाथ सोळंके (परभणी)
पृथ्वीराज पवार (सांगली)
शामाराम साहेबराव हिरे (नाशिक)
प्रदेश सचिव:
तानाजी (बापू) थोरात (पुणे)
सुनिल गोगटे (रायगड)
रामदास कोळगे (धाराशिव)
कोषाध्यक्ष:
समीर मिश्रा (नवी मुंबई)
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावर असणार भर
राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावणे, शेतीशी संबंधित शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि शेतकरी कल्याणकारी योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे यासाठी ही नवी कार्यकारिणी सक्रियपणे काम करेल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
या नव्या नियुक्त्यांमुळे राज्यातील भाजपा किसान मोर्चाचे संघटन अधिक मजबूत होईल, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.