राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्राचा डंका... नाशिकच्या विदितसह या खेळाडूंचा समावेश...

Share:
Main Image
Last updated: 19-Aug-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १९ ऑगस्ट - केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५’ ची घोषणा केली असून यामध्ये महाराष्ट्राने अत्यंत चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. राज्यातील दोन दिग्गज बुद्धिबळपटूंना प्रतिष्ठेचा 'अर्जुन पुरस्कार', एका महिला प्रशिक्षकाला 'द्रोणाचार्य पुरस्कार', तर पुण्यातील संस्थेला 'राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार' जाहीर झाला आहे.

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने दिलेल्या शिफारशींनुसार हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.

?s=20

महाराष्ट्राचे मानकरी:

अर्जुन पुरस्कार:

विदित संतोष गुजराती (ग्रँडमास्टर, बुद्धिबळ)

दिव्या जितेंद्र देशमुख (ग्रँडमास्टर, बुद्धिबळ)

द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी):

नेहा नंदकुमार चव्हाण (नेमबाजी प्रशिक्षक) – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवण्यात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल.

राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार:

आर्मी पॅरालिम्पिक नोड, पुणे – पॅरालिम्पिक खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, पायाभूत सुविधा आणि प्रोत्साहन देऊन त्यांच्या क्रीडा कारकिर्दीला आकार दिल्याबद्दल.

देशभरातील प्रमुख 'अर्जुन' पुरस्कारार्थी:

महाराष्ट्राच्या खेळाडूंसोबतच देशातील इतर प्रमुख खेळाडूंनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे:

Advertisement

क्रीडा प्रकार खेळाडूचे नाव

ॲथलेटिक्स - तेजस्विन शंकर, मुहम्मद अजमल व्ही., प्रियंका गोस्वामी

बॅडमिंटन - त्रिशा जॉली, पुल्लेला गायत्री गोपीचंद

हॉकी - लालरेमसियामी, राजकुमार पाल

कबड्डी - सुरजीत, पूजा

नेमबाजी / पॅरा-नेमबाजी - अखिल श्योरान, धनुष श्रीकांत, रुद्रांश खंडेलवाल

इतरनरेंद्र (बॉक्सिंग), एकता भायन (पॅरा-ॲथलेटिक्स), अरविंद सिंह (नौकानयन)

अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव)आय. अरुमइनायागम (फुटबॉल)

द्रोणाचार्य पुरस्कार (इतर मानकरी):

नियमित श्रेणी: परवीर सिंह (ॲथलेटिक्स), छोटे लाल यादव (बॉक्सिंग).

जीवनगौरव श्रेणी: धर्मेंद्र सिंह यादव (बॉक्सिंग), वीरेंदर कुमार (कुस्ती).

महाराष्ट्राच्या क्रीडा जगतात आनंदाचे वातावरण

महाराष्ट्रातील खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थेने क्रीडा क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची थेट राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याने राज्यभरातून या सर्व मानकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

?s=20

Comments

No comments yet.