महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या १४ नव्या सदस्यांची घोषणा... बघा कुणाला मिळाली संधी...

Share:
Main Image
Last updated: 18-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १८ ऑगस्ट -  राज्य शासनाने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (MMC) १४ नव्या सदस्यांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये शासनाने नामनिर्देशित केलेले ५ सदस्य आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी निवडून दिलेले ९ सदस्य अशा एकूण १४ सदस्यांचा समावेश आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने ‘महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५’ मधील तरतुदींनुसार यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. हे सर्व सदस्य शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी पदावर कार्यरत राहतील.

१४ नव्या सदस्यांची यादी:

शासनाने नामनिर्देशित केलेले ५ सदस्य:

डॉ. अजय गोविंद केणी

डॉ. राहुल कुलकर्णी

डॉ. प्रशांत नारायण चौधरी

डॉ. राजीव येरवडेकर

डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर

वैद्यकीय व्यावसायिकांनी निवडून दिलेले ९ सदस्य:

Advertisement

डॉ. संतोष अप्पासाहेब कदम

डॉ. संजय साहेबराव कदम

डॉ. निलेश वसंतराव निकम

डॉ. संजय गणेशराव देशपांडे

डॉ. सुनील माधवराव इंगळे

डॉ. अनिलकुमार भास्कर पाटील

डॉ. मंगेश मधुकर गुलवाडे

डॉ. उज्ज्वला किशनराव कराड

डॉ. अनिल शंकर पाचनेकर

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर निवड झालेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले असून, वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणा व डॉक्टरांच्या कल्याणासाठी हे मंडळ प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Comments

No comments yet.