अक्षय काळे, (मुंबई) १७ ऑगस्ट - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. नव्या टीममध्ये अनुभवी नेत्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून महाराष्ट्रातील नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर विनोद तावडे यांच्यावर विश्वास कायम ठेवत त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची धुरा कायम ठेवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांवर मोठी जबाबदारी
केंद्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राचा प्रभाव पाहायला मिळत असून पक्षाने राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश केला आहे:
डॉ. भारती पवार: राष्ट्रीय उपाध्यक्ष
विनोद तावडे: राष्ट्रीय सरचिटणीस
पीयूष गोयल: राष्ट्रीय कोषाध्यक्ष
प्रीती गांधी: सोशियल मीडिया सह-संयोजक
अनेक दिग्गजांना संधी, महिलांना प्राधान्य
नव्या टीममध्ये स्मृती इराणी आणि बिप्लव कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वसुंधरा राजे शिंदे, राम माधव, बी. वाय. पुरंदेश्वरी यांच्यासह एकूण १३ नेत्यांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. या यादीत महिला नेत्यांनाही मोठे प्रतिनिधित्व मिळाले आहे.
आगामी विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि संघटन मजबुतीकरणाच्या दृष्टीने ही नवी टीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.