विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी... या तारखेपर्यंत करता येणार अर्ज...

Share:
Main Image
Last updated: 17-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १७ ऑगस्ट - विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकीट संग्रहाची (फिलाटेली) अभिरुची वाढवण्यासाठी आणि संशोधनाला चालना देण्यासाठी भारतीय टपाल विभागाने 'दीनदयाळ स्पर्श योजना' (२०२६-२०२७) जाहीर केली आहे. इयत्ता ६ वी ते ९ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२६ आहे.

प्रमुख अटी आणि पात्रता:

इयत्ता व श्रेणी: विद्यार्थी भारतातील मान्यताप्राप्त शाळेत ६ वी ते ९ वी च्या वर्गात शिकणारा असावा. मागील वार्षिक परीक्षेत किमान ६०% गुण (SC/ST विद्यार्थ्यांसाठी ५५%) असणे अनिवार्य आहे.

फिलाटेली क्लब: विद्यार्थ्याच्या शाळेत 'फिलाटेली क्लब' असावा व तो त्याचा सदस्य असावा. क्लब नसल्यास विद्यार्थ्याचे स्वतःचे 'फिलाटेली डिपॉझिट खाते' असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया (दोन टप्पे):

Advertisement

निवड प्रक्रिया २७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित केली जाईल:

पहिला टप्पा (लेखी प्रश्नमंजूषा): चालू घडामोडी, इतिहास, विज्ञान, क्रीडा, संस्कृती, भूगोल आणि फिलाटेली यांवर आधारित ५० बहुपर्यायी प्रश्न (MCQs) विचारले जातील.

दुसरा टप्पा (प्रकल्प): प्रश्नमंजूषेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना फिलाटेलीवर ४ ते ५ पानांचा (कमाल १६ टपाल तिकिटे व ५०० शब्द) प्रकल्प सादर करावा लागेल.

अर्ज कसा करावा?

इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज केवळ 'स्पीड पोस्ट'नेच खालील पत्त्यावर १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी पाठवणे आवश्यक आहे:

पत्ता: वरिष्ठ अधीक्षक, टपाल कार्यालये, गोवा विभाग, पहिला मजला, टपाल भवन, पणजी-गोवा -- ४०३००१.

Comments

No comments yet.