नाशिकच्या तरुणाला नेपाळमध्ये ओलीस ठेवून मारहाण... खासदार सुप्रिया सुळेंकडून...

Share:
Main Image
Last updated: 16-Aug-2026

पुणे, (प्रतिनिधी) १६ ऑगस्ट - नाशिकमधील रहिवासी असलेल्या रोशन बर्डे या तरुणाला नेपाळची राजधानी काठमांडू येथे काही अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीरपणे डांबून ठेवून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित व्यक्ती रोशनकडून पैशांची मागणी करत असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

नेपाळमधून पालकांना फोन

रोशन बर्डे याने काठमांडू येथून नाशिकमधील आपल्या पालकांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. काही समाजकंटकांनी आपल्याला जबरदस्तीने डांबून ठेवले असून पैशांसाठी बेदम मारहाण करत असल्याचे त्याने पालकांना सांगितले. या संकटामुळे रोशनच्या कुटुंबीयांवर भीतीचे सावट पसरले असून त्यांनी त्याच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.

Advertisement

परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावासाला साकडे

या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) द्वारे परराष्ट्र मंत्रालय आणि नेपाळमधील भारतीय दूतावासाला टॅग करत तातडीने मदत करण्याचे आवाहन केले आहे. रोशन बर्डे याची लवकरात लवकर आणि सुरक्षित सुटका करावी, अशी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

या प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी कुटुंबीयांनी ८७८८२७२०७७ आणि ७३५०४९२२२२ हे संपर्क क्रमांक जारी केले असून, भारतीय दूतावासाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

?s=20

Comments

No comments yet.