ई-व्हिसाधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय... आणखी ११ आंतरराष्ट्रीय...

Share:
Main Image
Last updated: 11-Aug-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ११ ऑगस्ट - परदेशी पर्यटकांचा भारत प्रवास अधिक सुलभ आणि गतिमान करण्यासाठी केंद्र सरकारने ई-व्हिसा (e-Visa) प्रणालीचा विस्तार केला आहे. गृह मंत्रालयाने आणखी ११ नवीन आंतरराष्ट्रीय बंदरांना ई-व्हिसाधारकांसाठी मान्यता दिली आहे. यामध्ये ९ भू-सीमा (Landports) प्रवेशद्वारे आणि २ नवीन विमानतळांचा (Bhopal & Tirupati) समावेश आहे.

या नवीन निर्णयामुळे आता ई-व्हिसाधारकांसाठी देशात प्रवेश देणाऱ्या एकूण आंतरराष्ट्रीय बंदरांची संख्या ८८ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बंदरांची नवी रचना: आता देशात ३७ विमानतळे, ३८ सागरी बंदरे आणि १३ भू-सीमा बंदरांमधून ई-व्हिसाधारक परदेशी नागरिकांना भारतात प्रवेश करता येईल.

नव्याने समाविष्ट झालेली प्रवेशद्वारे:

विमानतळ (२): भोपाळ आणि तिरुपती.

Advertisement

भू-सीमा बंदरे (९): आगरतळा, दररंगा, गेलेपू/गेडे, घोजाडांगा, हरिदासपूर, जयगाव, डॉकी, मोरे (Moreh) आणि अटारी (रस्ता).

जलद आणि सुलभ प्रक्रिया: भारतात येणाऱ्या ई-व्हिसाच्या तब्बल ९५% अर्जांवर ७२ तासांपेक्षा कमी कालावधीत कार्यवाही पूर्ण केली जाते.

ई-व्हिसाचा वाढता विस्तार: २०१४ मध्ये अवघ्या ४३ देशांसाठी सुरू झालेली ई-व्हिसा सुविधा आता १७२ देशांतील नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

७८% व्हिसा डिजिटल: सध्या भारतात दिल्या जाणाऱ्या एकूण व्हिसांपैकी तब्बल ७८% व्हिसा हे 'ई-व्हिसा' स्वरूपातच दिले जातात.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत ठेवतानाच, परदेशी प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी व्हिसा नियम अधिक उदार आणि तंत्रज्ञानस्नेही करण्यावर भर दिला जात असल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

?s=20

Comments

No comments yet.