शेतकऱ्यांना मिळणार हे प्रमाणपत्र... मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 10-Aug-2026

कोल्हापूर, (प्रतिनिधी) १० ऑगस्ट - शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच, सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून या वर्षाअखेर ९० टक्के आणि पुढील वर्षापर्यंत राज्यातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कागल येथे विविध विकासकामांचे लोकार्पण, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या.

?s=20

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:

शेतकरी हित आणि वीज योजना: शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी शासन दरवर्षी २५ हजार कोटी रुपये खर्च करत आहे. सध्या ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून लवकरच हे प्रमाण १०० टक्क्यांवर नेले जाईल.

Advertisement

साखर उद्योग आणि इथेनॉल धोरण: इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, इथेनॉल धोरणामुळेच साखर कारखानदारी टिकली असून शेतकऱ्यांना एफआरपी (FRP) देणे शक्य झाले आहे.

देशातील पहिला सीबीजी प्रकल्प: साखर कारखानदारीतील उपउत्पादनांपासून सीबीजी (CBG) व सीएनजी (CNG) निर्मिती करणारा देशातील पहिला एकत्रित प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.

शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा: छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवरच राज्य सरकारचे कार्य सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

कार्यक्रमा दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, चंद्रकांत (दादा) पाटील, खा. शाहू महाराज छत्रपती यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

?s=20

Comments

No comments yet.