गणेशोत्सवासाठी कोकणात बिनधास्त जा...  'एसटी'ची मोठी भेट...

Share:
Main Image
Last updated: 09-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ९ ऑगस्ट - येत्या १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) कंबर कसली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी यंदा ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान ५,२२० जादा बसेस सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आढावा बैठकीत ही माहिती दिली.

"नफा-तोट्याचा विचार न करता कोकणवासीयांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ पूर्णपणे सज्ज आहे," असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

बाप्पाच्या प्रवासासाठी एसटीच्या खास सोयी:
आरक्षण सुरू: प्रवाशांना अधिकृत संकेतस्थळ (npublic.msrtcors.com), 'MSRTC Bus Reservation' मोबाईल ॲप किंवा बसस्थानकांवरील खिडकीवरून बुकिंग करता येईल.

१० ऑगस्टपासून 'गट आरक्षण' (Group Booking): किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून ही सुविधा उपलब्ध होईल.

Advertisement

सवलती लागू: गट आरक्षणात महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५०% सवलत, तर ७५ वर्षांवरील 'अमृत ज्येष्ठ नागरिकांना' १००% मोफत प्रवासाची सवलत कायम राहील.

चौवीस तास सेवा व दुरुस्ती पथके: गर्दीच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रमुख बसस्थानकांवर वरिष्ठ अधिकारी तैनात असतील. तसेच महामार्गावर गाड्या बंद पडल्यास

तात्काळ मदतीसाठी वाहनांची दुरुस्ती पथके (Mobile Repair Units) तैनात ठेवण्यात येणार आहेत.

?s=20

Comments

No comments yet.