मुंबई, (प्रतिनिधी) ८ ऑगस्ट - चित्रपट, वेब सिरीज, लाइव्ह स्पोर्ट्स आणि टीव्ही वाहिन्यांची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने दोन नवीन दीर्घ मुदतीचे ‘OTT-Pass’ सादर केले आहेत. यामध्ये ५५० रुपयांचा ८४ दिवसांचा आणि २,००० रुपयांचा ३६५ दिवसांचा प्लॅन समाविष्ट आहे. यापूर्वी जिओचा २०० रुपयांचा (२८ दिवस वैधता) पास उपलब्ध होता.
नवीन जिओ OTT-Pass ची वैशिष्ट्ये:
प्रीमियम OTT अॅप्स: YouTube Premium, JioHotstar Mobile + Hollywood, Amazon Prime (Lite/Video Mobile Edition) सह SonyLIV, ZEE5, Lionsgate Play, discovery+, Sun NXT, FanCode, Hoichoi, Chaupal, Planet Marathi यांसारख्या १५ प्रमुख अॅप्सचा समावेश.
लाइव्ह टीव्ही चॅनेल्स: JioTV द्वारे Star Plus HD, Colors HD, SET HD, Sun TV HD यांसह १,००० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्सचा अॅक्सेस.
हाय-स्पीड डेटा: २०० रुपयांच्या पासमध्ये ३०GB, ५५० रुपयांच्या पासमध्ये ९०GB, तर २,००० रुपयांच्या प्लॅनमध्ये तब्बल ३६५GB हाय-स्पीड डेटा आणि अमर्याद (Unlimited) 5G सेवा.
ग्राहकांची मोठी बचत:
८४ दिवसांसाठी २०० रुपयांचे तीन पास घेण्याऐवजी ५५० रुपयांचा पास घेतल्यास ५० रुपयांची थेट बचत होईल. तसेच वर्षभरासाठी २,४०० रुपयांऐवजी २,००० रुपयांचा पास निवडल्यास ग्राहकांचे ४०० रुपये वाचतील. कंपनीच्या दाव्यानुसार, ग्राहकांना दरमहा १,५०० रुपयांहून अधिक मूल्याचे मनोरंजन फायदे मिळतील.
हे पास ७ ऑगस्टपासून MyJio अॅप, जिओ वेबसाइट आणि अधिकृत रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध झाले असून, १ वर्षाचा सक्रिय बेस प्लॅन असलेल्या ग्राहकांसाठी हे लागू असतील. (टीप: व्हॉइस-ओन्ली प्लॅन्सवर ही ऑफर लागू नाही.)