माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांवर मंत्रालयात बैठक... मंत्र्यांनी दिले हे आदेश...

Share:
Main Image
Last updated: 08-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ८ ऑगस्ट - माजी सैनिक, युद्धात शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीय आणि वीरमातांच्या समस्यांचा तातडीने निपटारा करण्यासाठी जिल्हास्तरावर 'सैनिक दरबार' प्रभावीपणे आयोजित करण्याचे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित माजी सैनिक कल्याण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. "शासन माजी सैनिकांच्या मागण्यांबाबत अत्यंत संवेदनशील असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," असे यावेळी मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी सैनिक कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव संतोष कुमार, सैनिक कल्याण संचालक दीपक ठोंगे यांच्यासह विविध माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व निर्देश:
'सैनिक दरबार' चे आयोजन: जिल्हास्तरावर सैनिकांच्या समस्या प्राधान्याने व तात्काळ सोडवण्यासाठी जनदरबाराचे (सैनिक दरबार) नियमित आणि प्रभावी आयोजन केले जाईल.
बचत गटांसाठी नियमात शिथिलता: माजी सैनिकांच्या महिला बचत गटांना दिले जाणारे अर्थसहाय्य दोन टप्प्यात देणे आणि बचत गटांमधील 'तीन माजी सैनिक विधवां'ची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.

Advertisement

भरती व सेवा नियमांत सुधारणा: शिक्षण सेवक, आरोग्य सेवक, कृषी सेवक आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांसाठी सैनिकी पात्रता ग्राह्य धरण्याबाबत शैक्षणिक पात्रता व सेवा नियमांत आवश्यक सुधारणा केली जाईल.

विशेष भरती व कल्याणकारी योजना: माजी सैनिकांसाठी विशेष भरती मोहीम, राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) नियुक्त्या, नवी मुंबईत विश्रामगृह उभारणी, जिल्हास्तरीय सुविधा केंद्र, टोलमाफी आणि शहीद कुटुंबीयांच्या अनुकंपा नियुक्त्यांबाबत जलद गतीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.

मेस्को (MESCO) आणि सुरक्षा रक्षक: माजी सैनिक महामंडळातील (MESCO) वेतनवाढ, सुरक्षा रक्षकांचे सेवा लाभ, अधिकाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करणे आणि कंत्राटी कालावधी वाढवण्याच्या प्रस्तावांवर गतीने निर्णय घेतला जाईल.

Comments

No comments yet.