नीट पेपरफुटी प्रकरण... या १३ जणांवर आरोपपत्र दाखल...

Share:
Main Image
Last updated: 08-Aug-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ८ ऑगस्ट - बहुचर्चित 'नीट' (NEET) परीक्षा पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू येथील विशेष सीबीआय न्यायालयात एक महत्त्वपूर्ण आरोपपत्र (Chargesheet) दाखल केले आहे. सीबीआयच्या तपासात ही पेपरफुटी म्हणजे एक सुनियोजित आणि बहुराज्यीय गुन्हेगारी कट असल्याचे उघड झाले असून, यामध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) तीन विषय तज्ज्ञांसह एकूण १३ आरोपींची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

NTA चे तीन विषय तज्ज्ञ मुख्य संशयित
सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, NTA द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या विषय तज्ज्ञांनीच प्रश्नपत्रिका फोडून मध्यस्थांपर्यंत पोहोचवल्याचा गंभीर आरोप आहे.
मनिषा गुरुनाथ मांढरे (वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ)
प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी (रसायनशास्त्र तज्ज्ञ)
मनिषा संजय हवालदार (भौतिकशास्त्र तज्ज्ञ)

Advertisement

या तिघांनी प्रश्नपत्रिका कोचिंग क्लास चालक आणि मध्यस्थांकडे सोपवल्या, ज्यानंतर त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या.

इतर १० आरोपींची नावे
या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या कोचिंग चालक आणि मध्यस्थांचाही आरोपपत्रात समावेश आहे:
तेजस शाह, शिवराज मोटेगांवकर, डॉ. मनोज शिरुरे, मनिषा संजय वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार, यश यादव, मांगिलाल बिवाल, दिनेश बिवाल आणि विकास बिवाल.

कडक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल
पैशांच्या मोहापोटी चालवण्यात आलेल्या या मोठ्या जाळ्यावर सीबीआयने खालील कायद्यांनुसार गुन्हे दाखल केले आहेत:
भारतीय न्याय संहिता (BNS)
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (Prevention of Corruption Act)
सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) कायदा, २०२४

Comments

No comments yet.