नोकरदार महिलांचा वेळ वाचणार... बचत गटांची कमाई वाढणार..

Share:
Main Image
Last updated: 07-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ७ ऑगस्ट - महिला बचत गटांनी तयार केलेले दर्जेदार खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तू शासकीय कार्यालये, मेट्रो स्थानके आणि वसतिगृहांच्या परिसरात सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘शक्ती ऑन व्हील्स’ या नाविन्यपूर्ण प्रदर्शनी व विक्री व्हॅनचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सचिवालय जिमखाना येथे करण्यात आले.

अनिर्वेदशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आणि निवृत्त सनदी अधिकारी आर. विमला यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला आहे. राज्यातील नोकरदार महिलांचा वेळ वाचवणे आणि बचत गटांच्या महिला उद्योजकांना थेट ग्राहक मिळवून देऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

'शक्ती ऑन व्हील्स' उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये:
घरपोच आणि सोयीस्कर उपलब्धता: नोकरदार महिलांना त्यांच्या कार्यस्थळी आणि प्रवासाच्या ठिकाणी (मेट्रो स्टेशन, शासकीय कार्यालये) रेडी-टू-ईट पदार्थ, मिलेट (भरड धान्य) उत्पादने आणि घरगुती वस्तू सहज मिळतील.

१००% सेंद्रिय उत्पादने: या फिरत्या व्हॅनवर पापड, लोणची, तूप, विविध पिठे व रेडी-टू-ईट पदार्थ उपलब्ध असतील. ही सर्व उत्पादने कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर न करता सेंद्रिय (Organic) पद्धतीने तयार केली आहेत.

Advertisement

राज्य आणि देशव्यापी विस्तार: मुंबईतून सुरु झालेल्या या उपक्रमांतर्गत येत्या काळात राज्यभरात आणि देशभरात किमान १०० विक्री वाहने (Vans) सुरू करण्याचा मानस फाउंडेशनने व्यक्त केला आहे.

त्रिस्तरीय लाभ: या उपक्रमामुळे उत्पादक महिला, विक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहक अशा तिन्ही घटकांना थेट फायदा होणार आहे.

"महिला बचत गटांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळण्यासाठी हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. 'शक्ती ऑन व्हील्स'ची ही संकल्पना संपूर्ण राज्यात अधिक व्यापक प्रमाणात राबवली जाईल."
— आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री

?s=20

Comments

No comments yet.