मुंबई, (प्रतिनिधी) ६ ऑगस्ट - अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई मार्फत अनुसूचित जातीतील मातंग आणि त्यातील तत्सम समाजातील पात्र संशोधक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. २०२३, २०२४ व २०२५ या कालावधीत पीएच.डी.साठी (Ph.D.) कायम नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांकडून 'अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती' (ASNRF) योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली आहे.
अधिछात्रवृत्तीचे (फेलोशिप) स्वरूप
या योजनेअंतर्गत संशोधक विद्यार्थ्यांना दरमहा खालीलप्रमाणे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे:
कनिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्ती (JRF): ₹३७,००० प्रतिमाह
वरिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्ती (SRF): ₹४२,००० प्रतिमाह
कोण करू शकणार अर्ज?
अनुसूचित जातीतील मातंग, मांग, मिनीमादीग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग-गारोडी, मादगी आणि मादिगा या जातींमधील ज्या विद्यार्थ्यांनी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२५* या कालावधीत पीएच.डी.साठी कायम नोंदणी (Permanent Registration) मिळवली आहे, ते विद्यार्थी या फेलोशिपसाठी पात्र असतील.
अर्जाची मुदत आणि संकेतस्थळ
अर्जाचा कालावधी: ४ ऑगस्ट २०२६ ते ३ सप्टेंबर २०२६
अधिकृत संकेतस्थळ (माहितीसाठी): www.arti.org.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: fellowship.trti-maha.in
योजनेचा सविस्तर तपशील, पात्रता निकष आणि मार्गदर्शक सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन विहित मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन 'आर्टी' प्रशासनाकडून करण्यात आले आहे.