ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आता ही योजना... शालेय शिक्षणात होणार या विषयाचा समावेश...

Share:
Main Image
Last updated: 06-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी)  ६ ऑगस्ट - शिक्षणाची गुणवत्ता, मातृभाषेचे संवर्धन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा समतोल साधत राज्य शासन विद्यार्थीकेंद्रित शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करत आहे. राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राने आपले महत्त्वपूर्ण स्थान कायम ठेवले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजीतसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह शिक्षण विभागातील उच्च अधिकारी उपस्थित होते.

शाळांमध्ये नशामुक्ती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर
युवा पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी राज्य शासनाने 'ड्रग-फ्री स्कूल' (Drug-Free School) अभियान राबवण्याचा आणि शाळांमध्ये नशाविरोधी मार्गदर्शक व समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या धर्तीवर शालेय अभ्यासक्रमातही नशामुक्तीच्या अनुषंगाने पाठ्यक्रमाचा समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच शाळांमधील सुरक्षितता, सायबर फसवणूक आणि अमली पदार्थ प्रतिबंधासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी 'सुपर १००' योजना
शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना 'नीट' (NEET) आणि 'जेईई' (JEE) यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांचे उच्च दर्जाचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी 'सुपर १००' योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून गुणवान १०० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.

महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील प्रमुख ठळक मुद्दे:
विद्यार्थी-शिक्षक प्रमाण: राज्यातील १,०८,०६५ शाळांमध्ये २ कोटी २० लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून राज्यातील विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर २८ : १ आहे.
इतिहासाला सन्मान: राज्य शासनाच्या पाठपुराव्यामुळे एनसीईआरटीच्या (NCERT) पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला विस्तृत स्थान मिळाले आहे.
मराठी भाषा सक्तीची: राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या (SSC, CBSE, ICSE, IB) शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे आणि मराठी विषयाची परीक्षा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
आधुनिक प्रशिक्षण: 'एआय साथी'च्या (AI) माध्यमातून शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग आणि क्षमता वाढ उपक्रम राबवले जात आहेत.
अभिनव उपक्रम: निपुण महाराष्ट्र अभियान, राष्ट्र प्रथम अभियान आणि 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' यांसारख्या उपक्रमांमुळे शिक्षणाच्या दर्जात सातत्याने सुधारणा होत आहे.

?s=20

Comments

No comments yet.