नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ५ ऑगस्ट - फुकेत येथून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या 'AI2379' (एअरबस A320) या विमानाला मंगळवारी (४ ऑगस्ट) उड्डाणादरम्यान हवेच्या तीव्र दबावामुळे (Turbulence) जोरदार हादरे बसले. वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान त्वरित स्थिर केले आणि दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरवले. विमानात १३७ प्रवासी आणि ८ कर्मचारी (२ वैमानिक, ६ केबिन क्रू) असे एकूण १४५ जण प्रवास करत होते.
नागरी उड्डाण मंत्र्यांनी घेतली रुग्णालयात भेट:
विमान उतरल्यानंतर वैद्यकीय पथकाने सर्व प्रवाशांची तपासणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून ८ प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी मंत्रालयाच्या सचिवांसह फोर्टिस व मेदान्ता रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
?s=20
DGCA कडून सविस्तर चौकशी सुरू:
घटनेनंतर विमान हँगरमध्ये हलवण्यात आले असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी 'ब्लॅक बॉक्स' (फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर) सुरक्षित ताब्यात घेण्यात आला आहे. नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून प्रवाशांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
?s=20