आषाढी यात्रेत इतक्या लाख भाविकांचा सुखरूप प्रवास... एसटीला मिळाले इतक्या कोटींचे उत्पन्न...

Share:
Main Image
Last updated: 03-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३ ऑगस्ट - महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा असलेल्या पंढरीच्या वारीसाठी यंदाही राज्याची ‘लालपरी’ लाखो वारकऱ्यांची खरी सोबती ठरली आहे. आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने ५,५०० बसेसच्या माध्यमातून ९ लाख २४ हजार ७३८ भाविकांना सुरक्षित प्रवास घडवला. या विशेष वाहतुकीतून महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले असून, गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये ५ कोटी ३० लाख रुपयांची वाढ झाली आहे.

२१ हजारांहून अधिक फेऱ्यांचे नियोजन

आषाढी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरसाठी विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. एकूण २१ हजार ५२७ फेऱ्यांच्या माध्यमातून प्रचंड गर्दी आणि वाहतुकीचा ताण असतानाही अत्यंत नियोजनबद्ध रीतीने ही वाहतूक पार पाडण्यात आली.

"वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा" – प्रताप सरनाईक

Advertisement

"भाविकाला विठुरायाच्या दर्शनासाठी सुखरूप पंढरपूरला पोहोचवणे आणि दर्शनानंतर सुरक्षितपणे घरी आणणे, ही केवळ वाहतूक नसून एसटीच्या माध्यमातून घडणारी खरी विठ्ठलसेवाच आहे," अशी भावनिक प्रतिक्रिया परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

आपले घरचे सण-उत्सव बाजूला ठेवून अहोरात्र सेवा देणाऱ्या चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना त्यांनी ‘प्रवासी देवो भवः’ या भावनेने यापुढेही सेवा देण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले.

सामाजिक व सांस्कृतिक लोकवाहिनी

विविध सवलतींचा लाभ देत लाखो भाविकांना इच्छित स्थळी पोहोचवून एसटी महामंडळाने आपली सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. भविष्यातही लोकसेवेची ही परंपरा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.

?s=20

Comments

No comments yet.