या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती... महसूल विभागाचे गिफ्ट...

Share:
Main Image
Last updated: 02-Aug-2026

मुंबई. (प्रतिनिधी) २ ऑगस्ट - महसूल विभागातील प्रशासकीय कामकाजाला अधिक गती देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल विभागांतर्गत 'अपर जिल्हाधिकारी' संवर्गातून 'निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी' संवर्गात १३ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असून, शुक्रवारी (दि. ३१ जुलै २०२६) या संदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, पदोन्नती मिळालेल्या १३ अधिकाऱ्यांपैकी ३ अधिकारी पदोन्नतीच्याच दिवशी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

पदोन्नती मिळालेले १३ अधिकारी:

१. उपेंद्र गोविंद तामोरे

२. किरण संतोष मुसळे कुलकर्णी

३. देवदत्त विश्वंभर केकाण

४. राजेश श्रीपतराव काटकर

५. अजिंक्य नाथा पडवळ

६. दत्तात्रय नागनाथ भडकवाड

Advertisement

७. सुर्यकृष्णमूर्ती कोतापल्ली

८. बाळासाहेब बा. कोळेकर

९. पद्माकर रामचंद्र रोकडे

१०. सुभाष शांताराम बोरकर

११. सुनिल पुंडलिक थोरवे

१२. भाऊसाहेब गंगाधर फटांगरे

१३. विजय बिंदूमाधव जोशी

पदोन्नतीच्या दिवशीच ३ अधिकारी सेवानिवृत्त

पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांपैकी देवदत्त विश्वंभर केकाण, राजेश श्रीपतराव काटकर आणि अजिंक्य नाथा पडवळ हे तिन्ही अधिकारी ३१ जुलै २०२६ रोजी आपल्या दीर्घ प्रशासकीय सेवेनंतर शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. सेवापूर्तीचे औचित्य साधून मिळालेल्या या पदोन्नतीमुळे त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीचा गौरव झाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी पदोन्नती मिळालेल्या सर्व १३ अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, सेवानिवृत्त झालेल्या तीनही अधिकाऱ्यांना समाधानपूर्ण आणि दीर्घायुषी सेवानिवृत्त जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

No comments yet.