आता शत्रूची खैर नाही... अत्याधुनिक युद्धनौका 'निपुण' नौदलात दाखल...

Share:
Main Image
Last updated: 31-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३१ जुलै - हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने (HSL) बांधलेली 'निपुण' ही दुसरी पाणबुडी सहाय्य युद्धनौका (Diving Support Vessel - DSV) ३० जुलै २०२६ रोजी विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली. या जहाजाची रचना आणि बांधणी 'इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग' (IRS) च्या नियमांनुसार अत्यंत उच्च दर्जाची करण्यात आली आहे.

'निपुण' हे नाव संस्कृत भाषेतून घेण्यात आले असून, त्याचा अर्थ 'विशिष्ट विषयात अत्यंत प्रवीण, सक्षम आणि जाणकार असलेली व्यक्ती' असा होतो. नावाप्रमाणेच ही युद्धनौका अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून खोल समुद्रातील गुंतागुंतीच्या मोहिमा आणि आपत्कालीन बचाव कार्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे.

‘निपुण’ युद्धनौकेची प्रमुख वैशिष्ट्ये:

अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणे: या जहाजावर खोल समुद्रात बुडी मारण्याची (Deep Sea Diving) क्षमता असलेली आधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत.

Advertisement

साइड डायव्हिंग मंच: समुद्रातील मोहिमांदरम्यान डायव्हर्सना उतरणे सुलभ व्हावे यासाठी विशेष मंच तयार करण्यात आला आहे.

दूरसंचालित वाहने (ROVs): पाण्याखालील हालचालींवर अचूक देखरेख ठेवण्यासाठी आणि सुटका मोहिमा सुलभ करण्यासाठी दूरसंचालित वाहनांची व्यवस्था आहे.

'मदर शिप' म्हणून भूमिका: पाणबुडीमध्ये कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हे जहाज 'डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेसेल' (DSRV) साठी 'मदर शिप' म्हणून कार्य करेल.

सुमारे ७५ टक्के स्वदेशी सामग्रीचा वापर करून बांधण्यात आलेली 'निपुण' ही युद्धनौका केंद्र सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरली आहे. या नौकेच्या समावसामुळे खोल समुद्रातील मोहिमा आणि सागरी सुरक्षेच्या बाबतीत भारतीय नौदलाची क्षमता अधिक मजबूत झाली आहे.

?s=20

Comments

No comments yet.