सरकारी बस ड्रायव्हरकडे सापडले एवढे सारे घबाड... तपास अधिकारीही चक्रावले...

Share:
Main Image
Last updated: 30-Jul-2026

कोलकाता, (वृत्तसंस्था)  ३० जुलै - पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील मोहम्मदबाजार येथे एका माजी सरकारी बस चालकाच्या घरावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल २८.५० कोटी रुपयांची रोख रक्कम आणि १५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मिनार मंडल या संशयिताला अटक केली आहे.

संशयिताची पार्श्वभूमी: मिनार मंडल हा काही वर्षांपूर्वी उत्तर बंगाल राज्य परिवहन महामंडळात (NBSTC) बस चालक म्हणून कार्यरत होता. चार वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर तो दगड व्यापारी तुल्लू मंडल याच्या व्यवसायात व्यवस्थापक (मॅनेजर) म्हणून काम पाहू लागला होता.

छाप्याची कारवाई: दरोड्याच्या एका प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मिनार मंडलच्या घरावर मध्यरात्री धाड टाकली.

Advertisement

काय जप्त झाले?: घरात ठेवलेल्या सहा ट्रंक आणि दोन कपाटांमधून २८.५० कोटींची रोकड व १५ किलो सोने हस्तगत करण्यात आले. ही रोकड आणि सोने ट्रंकांमध्ये भरून सरकारी तिजोरीत जमा करण्यात आले असून संशयिताचे घर सील करण्यात आले आहे.

कुटुंबाचा दावा: जप्त केलेली रोकड आणि सोने हे आपले नसून फरार दगड व्यापारी तुल्लू मंडल याचे आहे, असा दावा मिनार मंडलच्या मुलाने केला आहे.

या कारवाईनंतर पोलिसांनी आरोपीला सिउरी न्यायालयात हजर केले असून, मुख्य सूत्रधार तुल्लू मंडल याचा शोध पोलीस घेत आहेत.

?s=20

Comments

No comments yet.