आता वेळ झालीय... अजिंक्य रहाणेने सोशल मीडिया पोस्टद्वारे उडवून दिली खळबळ...

Share:
Main Image
Last updated: 30-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३० जुलै - भारतीय क्रिकेट संघाचा माजी उपकर्णधार आणि कसलेला फलंदाज अजिंक्य रहाणे याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर एक भावुक व्हिडिओ पोस्ट करत त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा हा अध्याय संपवत असल्याचे घोषित केले. "फलंदाजी करताना मी नेहमी टायमिंगवर भरोसा ठेवला, मला टायमिंगचे महत्व कळतं आणि आता पुढे जाण्याची हीच योग्य वेळ (टाईम) आहे," असे म्हणत त्याने आपल्या निवृत्तीवर शिक्कामोर्तब केले.

"देश आणि संघ माझ्यासाठी स्वतःपेक्षा मोठे"

डोंबिवलीच्या लोकल प्रवासापासून सुरू झालेल्या आपल्या क्रिकेट प्रवासाची आठवण सांगताना अजिंक्य म्हणाला,

"लहानपणी सरावासाठी डोंबिवलीवरून ये-जा करण्याच्या दिवसांपासून मी या खेळाला माझे सर्वस्व दिले आहे. प्रत्येक डावात भारताची कॅप डोक्यावर असावी, हेच माझे स्वप्न होते. मी आयुष्यात एकच नियम पाळला—माझा देश आणि माझा संघ मी नेहमी स्वतःपेक्षा वर ठेवला."

आपल्या निवृत्तीच्या संदेशात त्याने बीसीसीआय (BCCI), मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA), आपले प्रशिक्षक, संघसहकारी, आयपीएल फ्रँचायझी, पत्नी राधिका, कुटुंब आणि सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले.

आता पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणार!

खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपत असली तरी क्रिकेटपासून दूर जाणार नसल्याचे संकेत अजिंक्यने दिले आहेत. "मी खेळासोबतचा प्रवास थांबवलेला नाही. या खेळातून मी जी मूल्ये आणि धडे शिकलो, ते पुढच्या पिढीला देण्यासाठी आणि खेळाला काहीतरी परत करण्यासाठी मी मार्गदर्शकाच्या (Mentor) भूमिकेतून उत्सुक आहे," असे त्याने स्पष्ट केले.

Advertisement

अजिंक्य रहाणेची थक्क करणारी कारकीर्द (आकडेवारी):

पदार्पण: २०११ मध्ये भारतीय संघात पदार्पण.

देशांतर्गत व प्रथम-श्रेणी क्रिकेट: २००७ मध्ये मुंबईकडून पदार्पण. २०५ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये ४२ शतकांसह १४,२०९ धावा.

लिस्ट-ए व टी-२०: १९२ लिस्ट-ए सामन्यांत ६,८५३ धावा, तर ३०८ टी-२० सामन्यांत ७,९६८ धावा.

आयपीएल (IPL) प्रवास: राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, केकेआर, चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांचे प्रतिनिधित्व.

"मी कधीही हार मानली नाही..."

आपल्या चाहत्यांना उद्देशून 'अज्जू' म्हणाला, "क्रिकेटने मला अनेकदा पराभवाची चव चाखायला दिली, पण एक जागा अशी आहे जिथे मी कधीही हार मानली नाही—ती म्हणजे तुमची मने! तुम्ही मला नेहमी कुटुंबातील सदस्य मानले. कॅप नंबर २७८, आता निरोप घेतो!"

?igsh=MWh0cmdyMTRjaXhqbg==

Comments

No comments yet.